Heater Affects Eyes: रुम हिटर वापरताना असा वापर करा, नाहीतर डोळ्यांना होऊ शकते गंभीर इजा
थंडीच्या दिवसांत स्वेटर आणि हीटरचा वापर केल्याने उबदार वाटते. मात्र त्याचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी तसेच डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतो.
नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत गरमागरम चहा किंवा कॉफी प्यायची मजा काही औरच असते. सध्या देशात उत्तरेकडील भागात तापमानात चांगलीच घट होत असून थंडी वाढत आहे. अनेक लोकं घरात हीटर (room heater) वापरत आहेत. रुम हीटरचा वापर केल्याने उबदार वाटते. मात्र त्याच्या अतिवापरामुळे आरोग्यालाही हानी (health problems) पोहोचते. हीटरसमोर जास्त वेळ बसल्याने कोरडी त्वचा (dry skin), ॲलर्जी, डोळे कोरडे होणे, झोपेच्या समस्या उद्बवतात तर कधी हे जीवघेणेही ठरू शकते.
हीटर का असतो धोकादायक ?
जर तुम्ही खोलीत हीटर लावून झोपलात तर त्यामुळे कार्बन मोनोऑक्साइडची पातळी वाढते. हृदयविकाराने त्रस्त असलेल्या लोकांना छातीत दुखू शकते. तसेच लहान मुले आणि वृद्धांना खूप त्रास होऊ शकतो.
गॅस हीटर लावून झोपल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. खोलीतील कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण वाढल्याने मेंदूपर्यंत रक्त नीट पोहोचत नाही, त्यामुळे ज्यामुळे रक्तस्त्राव आणि मृत्यू देखील होऊ शकतो.
कोरडी त्वचा, ॲलर्जी आणि डोळ्यांचा दाह
हीटरच्या वापरामुळे आपल्याला थंडीत उबदार तर वाटतं पण त्याच्या सततच्या वापरामुळे त्वचा कोरडी पडते, तसेच डोळ्यांनाही त्रास होतो. डोळे कोरडे होणे, डोळ्यांची जळजळ होणे अशा समस्यांसाठीही हीटर कारणीभूत ठरू शकतो. कोरड्या त्वचेमुळे खाज येणे, त्वचा लालसर होणे आणि ॲलर्जी असा त्रासही होतो. त्यामुळेच तुम्हाला हीटरशिवाय राहता येत नसेल तर खोलीत बसताना तुमच्या जवळ एका भांड्यात रपाणी ठेवावे, ज्यामुळे खोलीत ओलावा कायम राहील. तसेच हृदयविकार, दमा किंवा वृद्ध व्यक्तींनी हीटर वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
रूम हीटर वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा
– हीटरजवळ कोणतीही वस्तू ठेवू नका. विशेषत: कागद, बेड , फर्निचर आणि ब्लँकेट यांसारख्या आग लागणाऱ्या गोष्टींपासून हीटर दूर ठेवा.
– हीटरआग लागणार नाही अशा जागेवर ठेवा. हीटर कधीही कार्पेट, लाकूड किंवा प्लास्टिकजवळ ठेवू नका.
– लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना हीटरपासून दूर ठेवाय
– खोलीतून बाहेर पडताना हीटर कधीही चालू ठेवू नका. खोलीतून बाहेर पडताना हीटर नेहमी बंद करा.
– खोलीत कार्बन मोनोऑक्साइड वाढल्यास डोकेदुखी, चक्कर येणे, ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, मळमळ होणे आणि अशक्तपणा जाणवणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)