तिशितलं वृद्धत्व: उच्च रक्तदाब ते केसगळती; ‘या’ गोष्टी तुम्ही समजून घ्यायलाच हव्यात!

| Updated on: Dec 24, 2021 | 12:04 AM

वयाच्या तिशीनंतर प्रत्येक व्यक्तीनं आरोग्याबाबत सजग होणं आवश्यक ठरतं. धकाधकीच्या जीवनात जटिल विकारांच्या जाळ्यात ओढले जाण्याचा धोका टाळता येत नाही. दरम्यान, शरीरातील हार्मोन्सच्या बदलाचा थेट दृष्टीदोषापासून थकव्यापर्यंत जाणवतो. वयाच्या या टप्प्यात शरीराला आवश्यक प्रमाणात पोषक तत्वांची आवश्यकता असते.

तिशितलं वृद्धत्व: उच्च रक्तदाब ते केसगळती; ‘या’ गोष्टी तुम्ही समजून घ्यायलाच हव्यात!
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी दिल्ली– विशिष्ट वयाचा टप्पा गाठल्यानंतर आरोग्यासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावेच लागते. वयाची तिशी गाठल्यानंतर स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवणे नक्कीच आव्हानात्मक आहे. बदलती जीवनशैली व आहारामधील बदलामुळे तरुणपणातच अनेकांना जटिल विकारांनी घेरले आहे. शरीर हीच संपत्ती असून सुदृढ व निरामय आरोग्य जपणं आपलं कर्तव्य ठरतं.
वयाच्या तिशीनंतर प्रत्येक व्यक्तीनं आरोग्याबाबत सजग होणं आवश्यक ठरतं. धकाधकीच्या जीवनात जटिल विकारांच्या जाळ्यात ओढले जाण्याचा धोका टाळता येत नाही. दरम्यान, शरीरातील हार्मोन्सच्या बदलाचा थेट दृष्टीदोषापासून थकव्यापर्यंत जाणवतो. वयाच्या या टप्प्यात शरीराला आवश्यक प्रमाणात पोषक तत्वांची आवश्यकता असते. मात्र, पोषक तत्वांच्या अभावामुळे हाडांमध्ये कमजोरी, थकवा यासारख्या समस्या जाणवू लागतात.

हाडांची कमजोरी:

हाडांमध्ये निर्माण होणारी दुर्बलता सर्वसाधारण आढळणारी समस्या बनली आहे. वयाची तिशी पार केल्यानंतर व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियमच्या मात्रेत झपाट्याने घट होते.ज्यामुळे शरीरातील हाडे मोठ्या प्रमाणात ठिसूळ बनतात. अपघात किंवा सामान्य आघातामुळे हाडे मोडण्याचा धोका असतो. तुम्ही शरीराला कॅल्शियमचा पुरवठा करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे.

केस गळती

पुरुषांसोबत महिलांमध्ये केसगळतीची समस्या सर्वसाधारण मानली जाते. अलीकडे वयाच्या तिशीत केस गळतीच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धकाधकीच्या जीवनात पुरुष पुरेशा प्रमाणात प्रोटीन, लोह किंवा जीवनसत्वांचे सेवन करत नसल्यामुळे अकाली केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते.

हृद्यविकार व प्रोस्टेट कॅन्सर:

वयाच्या तिशीनंतर पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे हृद्याच्या रक्तभिसरण क्षमेतवर मोठा परिणाम संभवतो. रक्तदाबासारख्या विकाराची लागण होते. रात्रीची वेळी लघवी लागणे तसेच लघवीमध्ये जळजळ होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. तुम्हाला या स्वरुपाची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळीच उपचार घेण्याचा प्रयत्न करावा.

रक्तदाब:

वयाची तिशी पार केल्यानंतर पुरुषांनी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करायला हवी. उच्च रक्तदाबाची लक्षणे तुम्हाला नेहमीच जाणवतील असे नाही. त्यामुळे स्ट्रोक किंवा हृद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

Goa Elections 2022: गोव्यात आप आणि तृणमूल एकत्र लढणार का? वाचा काय म्हणाले केजरीवाल

ओमिक्रॉनचा धसका! उत्तर प्रदेशात रॅलीवर बंदी घाला, विधानसभा निवडणुकाही पुढे ढकला, थेट कोर्टाचं मोदींना आवाहन

कॅन्सलेशनच्या राईडला ‘ब्रेक’: ओलाचं नवीन फीचर; ड्रायव्हरसाठी ‘हे’ अनिवार्य