झोपेत तोंडातून लाळ सारखी बाहेर येते, ताबडतोब डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या
तोंडातून लाळ येणे ही सामान्य समस्या नाही, विशेषत: जेव्हा हि समस्या प्रौढांमध्ये वारंवार होताना दिसते. पार्किन्सन, स्ट्रोक आणि सेरेब्रल पाल्सी सारख्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे हे लक्षण असू शकते. याव्यतिरिक्त, संक्रमण, एलर्जी, ॲसिडिटी आणि जीईआरडी सारख्या समस्यादेखील लाळ येण्यास कारणीभूत ठरू शकतात.त्यामुळे तुम्हाला देखील ही समस्या सतावत असेल लगेच डॉक्टरांकडे जाऊन याची तपासणी करून घ्या.
रात्री गाढ झोपेत अनेकांच्या तोंडातून लाळ बाहेर येते. पण यात काही प्रमाणात लाळ गळणे सामान्य आहे. परंतु लाळ जर अधिक प्रमाणात बाहेर येत असेल तर हि एक समस्या आहे. तर तोंडातून सतत वाहणाऱ्या लाळेला सियालोरिया म्हणतात. जेव्हा तोंडामध्ये अन्नाचा संपर्क येतो तेव्हा तोंडात अधिक प्रमाणात लाळ तयार होत असते. अश्यातच कोणत्याही नियंत्रणाशिवाय लाळ अधिक प्रमाणात बाहेर काढते असेल तर हि गंभीर समस्या असू शकते यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण पहिल्या दोन वर्षांत बाळांमध्ये हे सामान्य आहे, कारण या वयात बाळांचे तोंडाच्या सभोवतालच्या स्नायूंवर पूर्ण नियंत्रण नसते. परंतु प्रौढांमध्ये ही समस्या अधिक जाणवत असेल तर पुढे जाऊन तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कधीकधी झोपेदरम्यान लाळ गळणे सामान्य मानले जाते. जर ही समस्या अधिक झाली असेल तर सेरेब्रल पाल्सी आणि पार्किन्सन रोग यासारख्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे लक्षण असू शकते.
झोपताना लाळ तोंडातून बाहेर का येते?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, झोपताना लाळ तोंडातून जास्त बाहेर येण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये काही शारीरिक आणि मानसिक समस्यांचा समावेश असू शकतो, जसे की तुमच्या शरीरातील स्नायूचे कार्य योग्यरित्या न होणे, अन्न गिळण्यास अडचण येणे किंवा कोणत्याही प्रक्रियाशिवाय जास्त लाळ तयार होणे. झोपण्याची स्थिती आणि डाएटमुळे अश्या अनेक कारणामुळे ही समस्या उद्भवू शकते.
झोपताना तोंडातून लाळ गळण्याची समस्या का उद्भवू शकते याची 5 गंभीर कारणे नेमकी कोणते आहेत ते जाणून घेऊयात
१. मेंदूचे विकार
मेंदूच्या विकाराने सुद्धा काही न्यूरोलॉजिकल परिस्थितीमुळे लाळ वाहू शकते. या अवस्थेत व्यक्तीचे स्नायूंवरील नियंत्रण कमकुवत होते, ज्यामुळे तोंडातून लाळ गळायला लागते.
मेंदूच्या विकारांची लक्षणे
स्ट्रोक (मेंदूतील रक्ताभिसरण थांबविण्याची स्थिती)
सेरेब्रल पॅरालिसिस
पार्किन्सन रोग (मज्जासंस्था विकार)
अधिक प्रमाणात विकेन्स जाणवणे. स्नायूची शक्ती कमी होणे.
मल्टीपल स्क्लेरोसिस
डाउन सिंड्रोम
ऑटिझम
संसर्गाने लाळेची समस्या निर्माण होणे
तुम्हाला काही संक्रमणांमुळे देखील लाळेच्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा तुम्हाला घशातील संसर्ग झाला असेल किंवा सायनस संसर्ग व टॉन्सिलिटिसचा संसर्ग झाला असेल तर तुमच्या तोंडातून लाळेची समस्या उद्भवू शकते. ज्यामध्ये टॉन्सिलायटीस आपल्या घशात आणि छातीत पसरतो, यामुळे देखील लाळ तोंडातून बाहेर येऊ शकते.
ॲलर्जी
अनेक लोकांना खानपाण्यातून म्हणा किंवा वातावरणातील बदलामुळे ॲलर्जीचे प्रकार होत असतात. तुम्हाला सुद्धा एखाद्या गोष्टीची ॲलर्जी झाली असेल तर यामुळे रात्री झोपेत तोंडातून अधिक लाळ वाहू शकते. ॲलर्जीच्या बाबतीत शरीर अधिक लाळ तयार करते जेणेकरून ॲलर्जीमुळे तयार झालेले विषारी पदार्थ बाहेर काढले जाऊ शकतात.
ॲसिडिटी
जर तुम्हाला देखील ॲसिडिटीची समस्या असेल तर तुम्हाला सुद्धा तोंडातून लाळ गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. कारण ॲसिडिटीमुळे पोटात जळजळ होते तेव्हा लाळेच्या ग्रंथी अधिक लाळ तयार करतात. त्यामुळे रात्री झोपेत तुमच्या तोंडून लाळ गळू शकते.
गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स रोग
गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स हा असा आजार आहे ज्यामध्ये पोटातील आम्ल द्रव अन्ननलिकेत परत येते. यामुळे पोटातील या अवस्थेतमुळे अन्ननलिकेचे अस्तर खराब होते आणि त्या व्यक्तीला घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटते आणि कोणतेही पदार्थ गिळण्यास त्रास होतो. ज्यामुळे तोंडात तयार झालेली लाळ बाहेर येऊ शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)