मुंबई : आता आपल्या बोटांच्या नखांद्वारे कर्करोगाचे प्राथमिक निदान करता येणार आहे. कॅन्सर रिसर्च नावाच्या एका संस्थेने दावा केला आहे की, या गंभीर आजाराचे प्राथमिक निदान साध्या फिंगर क्लबिंग टेस्टने केले जाऊ शकते असे म्हटले आहे. या टेस्टला स्कॅम्रोथची विंडो टेस्ट ( schamroth’s window test ) असे म्हटले जात आहे. या चाचणीमुळे आता शरीरातील इतर जुने आजार आणि कर्करोगाचे प्राथमिक निदान करणे शक्य होणार असल्याचे म्हटले जाते.
फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी क्लबिंग चाचणीचा पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्राथमिक निदान करणे आता सोपे झाले आहे. कॅन्सर रिसर्च नावाच्या एका संस्थेने संशोधन केले आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर गंभीर आजाराचे प्राथमिक निदान साध्या फिंगर क्लबिंग टेस्टने केले जाऊ शकणार आहे. फिंगर क्लबिंग ही चाचणी फुफ्फुसाच्या कर्करोगाची प्रारंभिक चिन्हे ओळखू शकते असे कॅन्सर रिसर्च नावाच्या एका संस्थेने म्हटले आहे.
तुमच्या शरीरात फुफ्फुसाचा कर्करोग किंवा फुफ्फुसाच्या इतर गंभीर आजाराची पूर्वलक्षणे शोधायची असतील तर ही ‘क्लबिंग चाचणी’ हा एक सोपा आणि प्रभावी उपाय असू शकतो. काही कारणांनी आपल्या बोटांच्या किंवा पायाच्या नखा खालील पेशी घट्ट होतात आणि नखं वरच्या दिशेने वळू लागतात अशा परिस्थितीत फिंगर क्लबिंग किंवा डिजिट क्लबिंग दिसून येते. हा बदल सहसा शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा जुनाट आजाराचे लक्षण असते. त्यामुळे तुमच्या नखांच्या खालील त्वचेच्या पेशींमध्ये वाढ झाली असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांची भेट घ्यायला हवी.
क्लबिंग टेस्ट करताना दोन्ही हातांची तर्जनी जोडावी. तुमच्या दोन्ही हातांची तर्जनी एकमेकांसमोर आणावी. त्यावेळी आपल्या तर्जनीच्या नखांच्या दरम्यान हिऱ्याच्या ( डायमंड ) आकाराची जागा दिसते का ते पाहावी. नखांच्या अगदी खाली एक लहान हिऱ्याच्या आकाराची जागा दिसल्यास, क्लबिंग नाही असे समजावे. जर नखांमधील ही जागा दिसत नसेल आणि बोटे पूर्णपणे एकमेकांच्या जवळ असतील तर ते क्लबिंगचे लक्षण असू शकते.