Health Tips: बैठ्या जीवनशैलीमुळे उद्भवतो जीवघेण्या समस्यांचा धोका, या अवयवांवर सर्वाधिक दुष्परिणाम
सेडेंटरी म्हणजे बैठी अथवा निष्क्रिय जीवनशैली धोकादायक असते असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. बराच काळ बसून राहणे किंवा जास्त वेळ झोपून घालवणे हे घातक ठरू शकते.
नवी दिल्ली – सेडेंटरी (Sedentary lifestyle) म्हणजे बैठी अथवा निष्क्रिय जीवनशैली धोकादायक (harmful effect) असते असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. बराच काळ बसून राहणे किंवा जास्त वेळ झोपून घालवणे या सवयी व्यतिरिक्त व्यायाम न (no exercise) करणे यामुळे निष्क्रिय दिनचर्या होते व त्यामुळे आरोग्य समस्यांचा (health problem) धोका वाढतो. यामुळे हृदयविकाराचा धोका आणि काही प्रकरणांमध्ये, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक, मधुमेह, लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना उद्भवू शकतात. बैठ्या जीवनशैलीमुळे जीवघेण्या आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.
जीवनशैलीतील विस्कळीतपणामुळे ज्या प्रकारे गंभीर आजारांचा धोका वाढत आहे, ते पाहता सर्वांनी शारीरिक हालचालींवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि व्यायामाचा समावेश आवर्जून करावा. लहान मुलांपासून तरूणांपर्यंत सर्वांनाच बैठ्या जीवनशैलीमुळे धोका आहे. त्याबद्दल सर्वांनी सतर्क राहण्याची गरज आहे
बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम
संशोधकांना असे आढळून आले आहे की बैठी जीवनशैली तुमच्या आरोग्याचा समस्यांचा धोका वाढवू शकते. यामुळे अनेक प्रकारच्या जुनाट आजारांचा धोका वाढतो जो घातक ठरू शकतो. सध्याच्या काळातील बहुतांश आजारांसाठी बैठी जीवनशैली हे प्रमुख कारण असून त्यामुळे लठ्ठपणा, टाईप-2 मधुमेह, काही प्रकारचे कॅन्सर, हृदयविकार होण्याचा मोठा धोका आहे.
वेळेपूर्वी मृत्यूचा धोका
जर तुम्हाला दीर्घ आयुष्य जगायचे असेल तर शारीरिक निष्क्रियता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. हे अकाली मृत्यूसाठी एक प्रमुख कारण ठरते. एका अभ्यासातून असे आढळून आले की बैठी जीवनशैली असलेल्या लोकांचे सरासरी वय हे नियमित व्यायाम किंवा योगाभ्यास करणाऱ्यांपेक्षा कमी असते. बैठी जीवनशैली असलेल्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे अकाली मृत्यू होऊ शकतो.
मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम
बैठ्या जीवनशैलीचा मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. 10,381 सहभागी लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असे आढळून आले की बैठी जीवनशैली असलेल्या लोकांना कालांतराने नैराश्याचा धोका वाढू शकतो. तसेच कमी शारीरिक हालचालींमुळे आनंद वाढवणाऱ्या हार्मोन्सचा स्रावही कमी होतो, ज्यामुळे तुमचा मूड प्रभावित होतो, असेही शास्त्रज्ञांना आढळले.
शरीर ठेवा फिट आणि रहा सक्रिय
नियमित व्यायाम-योग सर्वांसाठी आवश्यक आहे, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. संशोधनात असे दिसून आले आहे की शारीरिक हालचाली, व्यायाम आणि खेळ यांना दैनंदिन दिनचर्याचा एक भाग बनवल्याने हृदयविकार, टाइप-2 मधुमेह, लठ्ठपणा आणि अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. सर्व प्रौढांनी आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम केला पाहिजे.