Health Alert : अतिझोप आरोग्यासाठी हानिकारक, होऊ शकतात ‘हे’ आजार

शांत झोप ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाची असते. ज्याप्रमाणे कमी झोपणाऱ्यांना अनेक त्रास होऊ शकतात, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त झोप घेणाऱ्या लोकानांही त्याचा त्रास होऊ शकतो.

Health Alert : अतिझोप आरोग्यासाठी हानिकारक, होऊ शकतात 'हे' आजार
अतिझोप आरोग्यासाठी हानिकारक, होऊ शकतात 'हे' आजार Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 12:23 PM

शांत, विनाव्यत्यय झोपणे (Sleeping) हे आरोग्यासाठी चांगले असते. चांगल्या झोपेमुळे शरीर आणि मन दोन्ही ताजंतवानं होतं. झोप ही शरीरासाठी औषधासारखी असते, कारण झोपेतही शरीराचे दुरुस्तीचे काम सुरू असते. रोज 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. पण ज्याप्रमाणे कमी झोपणाऱ्यांना अनेक त्रास होऊ शकतात, तसाच त्रास अतिझोपेमुळेही (Side Effects of Sleeping Too Much) होतो. एखादी गोष्ट अतिप्रमाणात केली की त्याचे परिणाम वाईट होतात. बऱ्याच लोकांना सकाळी लौकर उठता येत नाही. तुम्हीही त्यापैकीच एक असाल, तर आजच ही वाईट सवय मोडा. कारण कमी झोपेप्रमाणेच अति झोपणे (7-8 तासांपेक्षा अधिक) हेही शरीरासाठी हानिकारक (Health problems) असते. त्यामुळे तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अतिझोपेमुळे काय त्रास होऊ शकतो, हे पाहूया.

मधुमेह

जे लोक जास्त वेळ झोपतात, त्यांची शारीरिक हालचाल अतिशय कमी असते. त्यामुळ त्यांची शुगर लेव्हल वाढण्याचा धोका असतो. एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, 9 तासांपेक्षा अधिक काळ झोपल्यास (त्या) व्यक्तीच्या शरीरातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका वाढतो.

डोकं दुखणं

बऱ्याच वेळा गरजेपेक्षा जास्त वेळ झोपून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास होतो. तसेच शरीरही जड वाटू लागते. अशा वेळेस कॉफी पिणे फायदेशीर ठरू शकते. तसेच झोपेची वेळ कमी आणि नियंत्रित करणेही गरजेचे ठरते.

हे सुद्धा वाचा

हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो

अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन मध्ये छापून आलेल्या माहितीनुसार, जास्त वेळ झोपल्यामुळे हृदयशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. या अभ्यासानुसार, ज्या महिला 9 ते 11 तास झोपतात, त्याच्यांत हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता 38 टक्क्यांपर्यंत वाढते.

डिप्रेशन

तुम्ही हे वाचून हैराण व्हाल की, गरजेपेक्षा जास्त झोपणे हे डिप्रेशनचे कारण ठरू शकते. पीएलओएसमध्ये पब्लिश झालेल्या एका अभ्यासानुसार, जास्त झोप घेणे डिप्रेशनसाठी कारणीभूत ठरू शकते. एवढेच नव्हे तर गरजेपेक्षा जास्त वेळ झोपल्यामुळे व्यक्ती सुस्त होतात आणि त्यांना रोजची कामे करणेही नकोसे वाटू शकते.

पाठदुखी

सतत एका जागी , खुर्चीवर बसून काम करणारे लोक जर जास्त वेळ झोपत असतील तर त्यांना पाठदुखी, मानदुखी, खांदे दुखणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीराची कमी हालचाल झाल्यामुळे शरीराला जडत्व आल्यासारखेही वाटते.

स्थुलता

गरजेपेक्षा जास्त वेळ झोपल्यामुळे शरीराची हालचाल अतिशय कमी होते. अशा व्यक्ती जास्तीस्त वेळ खाण्या पिण्यात, बसण्यात किंवा झोपण्यात घालवतात. थोडाही व्यायम वा हालचाल होत नाही. या सर्वांचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो, ज्यामुळे वजन वाढून व्यक्ती स्थूल होते. त्यामुळे पचनक्रियेवरही परिणाम होऊन आरोग्याच्या समस्या वाढू लागतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.