Health: कापलेल्या फळांवर मीठ किंवा साखर घालून खाता? जाणून घ्या त्याचे परिणाम

अनेक वेळा फळांची चव किंवा गोडी वाढवण्यासाठी ते त्यावर मीठ किंवा साखर घालून खातात, मात्र त्याचे परिणाम अनेकांना माहिती नाही.

Health: कापलेल्या फळांवर मीठ किंवा साखर घालून खाता? जाणून घ्या त्याचे परिणाम
ताजी फळं Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 2:14 PM

मुंबई,  तुम्ही कधी उन्हाळ्यात कलिंगडावर मीठ (Extra Salt) घालून किंवा पेरूवर चाट मसाला घालून खाल्ले आहे का? खरबूजात साखर घालून त्याचा आस्वाद घेतला आहे का? अनेकदा लोक ताजी फळे (freshly cut fruits) कापून खातात किंवा त्यांचे सॅलॅड बनवतात. फ्रुट सॅलॅड बनवण्यासाठी लोकं कापलेल्या फळांवर चाट मसाला किंवा मीठ भुरभुरवतात. यामुळे फळाची चव वाढते. घरी असताना कांदा, काकडी वगैरेही कापून त्याचे सॅलॅड बनवून त्यात मीठ (Salt) घालून घेतले जाते. अनेक वेळा लोक कापलेल्या फळांमध्ये साखर घालून फळांचा गोडवा आणखी वाढतो. जर तुम्हालाही चिरलेल्या फळांवर साखर, मीठ किंवा चाट मसाला घालून खायला आवडत असतील तर सावध व्हा. अशा पद्धतीने फळांचे सेवन करणे हे तुमच्या आरोग्यासाठी (harmful) हानिकारक ठरू शकते. फळांचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया, जेणेकरून आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही.

फळांवर मीठ घालून खाल्याने होणारे नुकसान –

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कापलेल्या फळांवर मीठ घातल्यास फळांमधून रस पाझरू लागतो. यामुळे फळांमध्ये असलेली पोषक तत्वं संपुष्टात येतात. तसेच मीठ किंवा चाट मसाला यामध्ये असलेल्या सोडिअमचा किडनीवर परिणाम होतो. जर तुम्ही मीठ आणि चाट मसाला या दोन्हीचे सेवन केले कर शरीरात सोडिअमचे प्रमाण वाढते, कारण चाट मसाल्यामध्येही मीठ असतेच.

फळांवर साखर घालून खाण्याचा दुष्परिणाम –

प्रत्येक फळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. तसेच त्यामध्ये ग्लूकोजही असते, ज्यामुळे कॅलरीज वाढतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही कापलेल्या फळांमध्ये आणखी साखर घातली तर शरीरातील साखरेचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. अतिरिक्त साखरेमुळे वजनही वाढू शकते. ज्या व्यक्ती मधुमेहग्रस्त आहेत, त्यांच्यासाठी फळांवर साखर घालून सेवन करणे नुकसानकारक ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

फळं खाण्याची योग्य पद्धत –

फळं खाण्याची एक योग्य पद्धत आहे. बऱ्याच वेळेल लोक फळांचे सॅलॅड बनवून खातात. भारतीय जेवणात कार्ब्स आणि कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. मात्र आपण जेव्हा जेवणासाह फळांचेही सेवन करतो तेव्हा कार्ब्स आणि कॅलरीज आणखीन वाढतात. अशा परिस्थितीत जेवणातील कार्ब्सचे प्रमाम कमी करून फळं खाऊ शकतो. अन्यथा जेवण आणि फळं एकत्र खाऊ नयेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.