कडुलिंब आणि हळदीमुळे कॅन्सर बरा होतो, असा सिद्धूचा दावा; टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले…

माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 4 चा कॅन्सर झाला होता. हळद, कडुलिंब,लिंबू आणि आवळा या आयुर्वेदिक गोष्टी खाल्ल्ल्याने कॅन्सर बरा झाला असा दावा नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे. त्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशातील सर्वात मोठं रुग्णालय असलेल्या टाटा मेमोरियल रुग्णालातील डॉक्टरांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.

कडुलिंब आणि हळदीमुळे कॅन्सर बरा होतो, असा सिद्धूचा दावा; टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 6:59 PM

माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 4 चा कॅन्सर झाला होता. कडुलिंब, हळद, लिंबू आणि आवळा यांचा आहारात वापर करून त्या पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाल्याचा दावा नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे. घरगुती उपचारांनी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्याचं नवज्योतसिंग सिद्धू यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक कर्करोग रुग्ण त्यांच्या डॉक्टरांना आयुर्वेदिक उपचार करण्याबाबत विचारणा करत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इतकंच काय देशातील नामांकित असं कॅन्सर रुग्णावर उपचार करणाऱ्या टाटा मेमोरियेल रुग्णालयातील 200हून अधिक डॉक्टरांनी लोकांना आवाहन करणारं एक पत्र जारी करावं लागलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, माजी क्रिकेटपटू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते आपल्या पत्नीच्या स्तनाच्या कॅन्सरबाबत सांगत आहेत. व्हिडीओतील काही भागात त्यांनी आहाराचा उल्लेख केला आहे. डेअर उत्पादनं आणि साखर खाणं बंद केलं. तसेच उपचारासाठी कडुलिंब आणि हळदीचा वापर आहारात केला. त्याच्या मदतीने कॅन्सर बरा होण्यास मदत झाली. याबाबत डॉक्टरांनी पत्रात लोकांना आवाहन केलं आहे.

डॉक्टरांनी आपल्या आवाहानात्मक पत्रात लिहिलं आहे की, अशा दाव्याबाबत मेडिकल सायन्समध्ये कोणतंही प्रमाण नाही. अशा आयुर्वेदिक उपचारांवर संशोधन सुरु आहे. पण हळद आणि कडुलिंबामुळे कॅन्सर बरा होतो असं कुठेच सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळे या दाव्यात काहीच तथ्य नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कॅन्सरबाबत कोणतीही लक्षणं आढळल्यास डॉक्टर आणि कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळीच निदान झाले तर कर्करोग बरा होऊ शकतो.

Tata_Doctor_Letter

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे (एफएआयएमए) अध्यक्ष डॉ. सुवर्णकार दत्ता म्हणाले की, कॅन्सरच्या उपचाराबाबत चुकीची माहिती घातक ठरू शकते. कडुलिंब आणि हळद या गोष्टीत कॅन्सरविरोधी घटक असतात की नाही याबाबत संशोधन सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अशा  वक्तव्यांवर विश्वास ठेवू नका. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. कर्करोगाचं योग्यवेळी निदान करा आणि वेळीच उपचार करा. उशीर केल्यास जीवावर देखील बेतू शकतं. सोशल मीडियावर विश्वास न ठेवता कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असंही डॉ. सुवर्णकार दत्ता यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....