Study: बराच काळ बसून राहण्याचे दुष्परिणाम, होऊ शकतो स्मृतिभ्रंश

बराच वेळ बसून राहण्याची सवय ही आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक असल्याचे आरोग्य तज्ञ मानतात. शारीरिक निष्क्रियता वाढवण्याच्या या सवयीमुळे वजन तर वाढतेच पण त्याचा रक्तदाबावरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.

Study: बराच काळ बसून राहण्याचे दुष्परिणाम, होऊ शकतो स्मृतिभ्रंश
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 12:13 PM

नवी दिल्ली – बराच काळ बसून राहण्याचे अथवा बसून काम (sitting) करण्याचे अनेक दुष्परिणाम असू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे. शारीरिक निष्क्रियतेच्या या सवयीमुळे वजन तर वाढतेच (weight gain) पण त्याचा रक्तदाबावरही (blood pressure) नकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळेच तज्ञ सर्व लोकांना, विशेषत: ऑफिसमध्ये काम करणार्‍यांना, एकदातरी खुर्चीतून उठून चालण्याचा सल्ला देतात. बराच काळ बसण्याचे खूप दुष्परिणाम दिसून येतात. अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात संशोधकांनी लोकांना त्याच्या मानसिक आरोग्यावर (effect on brain) होणाऱ्या परिणामांबद्दल सावध केले आहे.

या संशोधनात वैज्ञानिकांना असे आढळून आले की 7-8 तास सततएकाच जागी बसण्याच्या सवयीमुळे मेंदूची वेळोवेळी नवीन गोष्टी साठवण्याची क्षमता कमकुवत होते, तसेच त्याचा स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. जे लोक जास्त वेळ बसून राहतात त्यांची स्मरणशक्ती कमकुवत होते. संशोधकांच्या सांगण्यानुसार, ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करण्याची सवय सामान्य झाली आहे, सर्व लोकांनी त्याच्या दुष्परिणामांबद्दल काळजी घेणे आवश्यक आहे.

याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया

हे सुद्धा वाचा

बराच वेळ बसण्याचा मेंदूवर परिणाम

बराच वेळ बसून राहण्याचा शरीर आणि मेंदूवर किती वेळ बसून परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी सेमल इन्स्टिटय़ूट फॉर न्यूरोसायन्स अँड ह्युमन बिहेविअरच्या शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला. यामध्ये 45-75 वयोगटातील 35 स्पर्धकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांना त्यांच्या शारीरिक हालचालींबद्दल आणि ते दिवसातून किती तास बसून काम करतात याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. अशा सवयीचा मेंदूवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी सहभागींचे एमआरआय स्कॅन करण्यात आले. शास्त्रज्ञांनी अनेक पातळ्यांवर केलेल्या विश्लेषणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.

अभ्यासात काय आढळले ?

जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातील अहवालानुसार, जे लोक जास्त वेळ बसून राहतात त्यांच्या मेंदूचा भाग (टेम्पोरल लोब) कालांतराने प्रभावित होऊ शकतो. या स्थितीमुळे मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो तसेच स्मृतिभ्रंशाचा धोका वाढू शकत. मेंदूच्या संरचनेतील बदलांमुळे स्मृतिभ्रंश ही स्थिती उद्भवते, ज्यामुळे स्मरणशक्ती, विचार आणि भावनांवर परिणाम होऊ शकतो.

दिवसभरात 8 तास बसून राहणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूचा भाग (टेम्पोरल लोब) 4-5 तास बसून राहणाऱ्या व्यक्तीपेक्षा 10 टक्के पातळ असू शकतो, असे संशोधकांनी विश्लेषणात म्हटले आहे. टेम्पोरल लोब हा मेंदूचा एक भाग आहे जो आठवणी आणि आवाजांसाठी जबाबदार असतो

काय आहे या संशोधनाचा निष्कर्ष ?

तुम्ही व्यायाम करत असाल आणि तुम्हाला बराच वेळ बसून राहण्याची सवय असेल तरीही तुम्हाला असे दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात, असे या अभ्यासाच्या प्रमुखांनी सांगितले. तुम्हाला दिवसाचे 8 तास ऑफिसमध्ये काम करावे लागत असेल, तर तेवढा पूर्ण वेळ बसून न राहता जास्तीत जास्त वेळ उभं राहून काम करण्याचा प्रयत्न करा. यामुळे रक्ताभिसरण चांगले राहण्यास मदत होते आणि मेंदूसोबत इतर शारीरिक दुष्परिणामही कमी होऊ शकतात. थोड्या वेळाने जागेवरून उठण्याची आणि अधून-मधून चालत राहण्याची सवय ठेवावी. अशा परिस्थितीमध्ये स्टँडिंग वर्किंग स्टेशन हा एक चांगला पर्याय असू शकतो.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....