लहान वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्यात? फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय
आजकाल प्रदूषण, अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींचाही त्वचेवर परिणाम होतो. ज्यामुळे सुरकुत्या सारख्या वृद्धत्वाची चिन्हे लहान वयातच दिसू लागतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

आपली त्वचा चमकदार आणि निरोगी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण हल्ली त्वचेशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्वचेवर काळे डाग पडणे व सुरकुत्या यासारख्या समस्या लहान वयातच दिसू लागले आहेत. यामागे अनेक कारणे असू शकतात. सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे, चुकीचा आहार, तळलेले मसालेदार पदार्थ आणि जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन करणे. तसेच प्रदूषण आणि तणाव यामुळेही त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
अशावेळी या वृद्धत्वाच्या लक्षणांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्वचेची काळजी घेणारी अनेकजण बाजारातील महागडी उत्पादने वापरतात. परंतु या उत्पादनाचा फारसा उपयोग होत नाही. काळानंतरने या महागडे उत्पादनाचा देखील परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. यासाठी अनेकांचा कळ हा घरगुती उपायांवर वाळलेला आहे. त्यामुळे घरात असलेल्या काही गोष्टी त्वचेवरील काळे डाग आणि सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करतात. तसेच हे उपाय तुमच्या त्वचेवर चमक आणण्यास देखील मदत करू शकतात.
कोरफड जेल
कोरफडमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास आणि त्वचेवर चमक आणण्यास मदत करतात. तुम्ही ताज्या कोरफडीमधून गर काढून त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करा. त्यानंतर कोरफड जेलचा हा पॅक २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. अशाने काही दिवसांनी तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी झालेल्या दिसतील.




हळद आणि दुधाची पेस्ट
हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-एजिंग गुणधर्म असतात. त्याचबरोबर दुधात लॅक्टिक ॲसिड असते, ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि मऊ होण्यास मदत होते. हळद आणि दुधाची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे सुकू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. यामुळे त्वचा चमकदार होण्यास ही मदत होते. व चेहऱ्यावरील काळे डाग देखील कमी होतात.
संत्र्याच्या सालीची पावडर
त्वचा चमकदार करण्यासाठी संत्र्याची साल देखील उपयुक्त ठरू शकते. हे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास देखील मदत करू शकते. संत्र्याची साल वाळवून त्याची पावडर तयार करून त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून चेहऱ्यावर लावावे. १५ मिनिटांनी धुवून टाका.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल
व्हिटॅमिन ई चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे. कारण यामुळे कोलेजेनचे उत्पादन वाढण्यास आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल चेहऱ्यावर लावू शकता. व्हिटॅमिन ई कॅप्सूल हे कोरफड जेल किंवा खोबरेल तेलात मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)