Health : तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने झोपत असताल तर सावधान, एकदा ही बातमी वाचा!
झोपताना बहुतेक लोक हे मोठी उशी घेऊन झोपतात. तर काही लोक हे उशी न घेता झोपतात. पण जे लोक उंच किंवा जाड उशी घेऊन झोपतात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर या समस्या काय आहेत याबाबत आपण जाणून घ्या.
मुंबई : प्रत्येक व्यक्तीला डॉक्टर नेहमी 7 ते 8 तास पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. कारण जर निरोगी आणि फ्रेश राहायचं असेल तर पुरेशी झोप घेणं गरजेचं असतं. जर तुमची झोप नीट नाही झाली तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. तसंच झोपताना बहुतेक लोक हे मोठी उशी घेऊन झोपतात. तर काही लोक हे उशी न घेता झोपतात. पण जे लोक उंच किंवा जाड उशी घेऊन झोपतात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तर या समस्या काय आहेत याबाबत जाणून घ्या.
1. रक्ताभिसरण होणे – झोपताना डोक्याखाली मोठी उशी घेऊ नये. कारण मोठी उशी घेतल्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही. तसंच आपल्या केसांनाही योग्य ते पोषण मिळत नाही. त्यामुळे डोक्याखाली मोठी उशी घेणं टाळावं.
2. मानदुखी- मोठी किंवा उंच उशी घेऊन झोपल्यामुळे मानदुखीची समस्या निर्माण होते. कारण मोठी उशी घेतल्यामुळे आपली मान अवघडून जाते, त्यामुळे मानदुखीची समस्या निर्माण होते. तर रात्री झोपताना मोठी उशी न घेता मऊ आणि पातळ उशी घेऊन झोपा.
3. पाठीचा कणा दुखणे – मोठी, जाड उशी घेऊन झोपल्यामुळे मणक्याचे दुखणे त्रास देऊ शकते. त्यामुळे झोपतात नेहमी पातळ उशी घेऊन झोपा.
4. हात-खांदे दुखणे – झोपताना जे लोक मोठी उशी घेवून झोपतात त्यांना खांदे दुखी किंवा हातदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. बहुतेक लोकांना खांदे दुखीची समस्या सतावत असते. तर अशा लोकांनी नेहमी मऊ आणि छोट्या उशीचा वापर करावा.