Risks of Smoking: धूम्रपान शरीरसाठी हानिकारक, हे 5 आजार वाढण्याचा असतो धोका
धूम्रपान करणे हे केवळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानकारक नव्हे तर त्यामुळे मधुमेह वाढू शकतो व गंभीर परिस्थितीही उद्भवू शकते.
नवी दिल्ली – धूम्रपानाची सवय (smoking) अतिशय घातक आहे हे आपण सर्वांना माहीत आहेच. धूम्रपान केल्यामुळे शरीरावर गंभीर (side effects on body) दुष्परिणाम होतात तसेच काही वेळेस जीवघेणी परिस्थितीही उद्भवू शकते. धूम्रपान केल्याने श्वसनसंस्था, रक्ताभिसरण, प्रजनन यंत्रणा, त्वचा, डोळे यांवर वाईट परिणाम होतो. यामुळेच धूम्रपान करणे ही अत्यंत वाईट सवय समजली जाते. असे म्हटले जाते की धूम्रपान केल्यामुळे मधुमेहाचा (diabetes) त्रास वाढू शकतो. तसेच आरोग्यासंदर्भातील इतर समस्याही उद्भवू शकतात.
धूम्रपानामुळे या समस्यांचा धोका वाढू शकतो
तंबाखूचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. धूम्रपान करण्याचा कोणताही सुरक्षित मार्ग नसतो, सिगारेटऐवजी सिगार, पाईप आणि हुक्का वापरूनही आरोग्याला होणारा धोका कमी होत नाही. धूम्रपान केल्यामुळे खालील समस्या उद्भवू शकतात :
फुफ्फुसाचे नुकसान
धूम्रपानाचा सर्वात वाईट परिणाम आपल्या शरीराती फुफ्फुसांवर होतो. कारण, यामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या श्वासात निकोटीन इनहेल (आतमध्ये ) केले जाते. त्यामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर होण्याचा धोका वाढतो.
हृदयविकार
धूम्रपानामुळे आपल्या शरीरातील हृदय, रक्तवाहिन्या आणि रक्तपेशींचे नुकसान होऊ शकते. सिगारेटमधील घातक रसायने आणि टार यामुळे एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होतो. हे जमा झाल्यामुळे रक्तप्रवाह मर्यादित होतो आणि ब्लॉकेज होऊ शकते.
प्रजनन क्षमतेवर परिणाम
धूम्रपान केल्यामुळे स्त्रियांच्या प्रजनन संस्थेला अथवा व्यवस्थेला हानी पोहोचू शकते व त्या गरोदर राहण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण सिगारेटमध्ये असलेला तंबाखू आणि इतर रसायनांमुळे हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होतो. धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती
धूम्रपान केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. ज्यामुळे रोगांचा अथवा आजारी पडण्याचा धोका वाढतो. यामुळे शरीरातील जळजळही वाढू शकते.
कॅन्सर
धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर तसेच इतर कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. असे मानले जाते की धूम्रपान न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्या लोकांना ब्लॅडर कॅन्सर होण्याचा धोका तिप्पट असतो. त्याशिवाय तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, कोलन कॅन्सर इत्यादी होण्याचा धोकाही वाढतो.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)