मानसिक आरोग्यासाठी सूर्यप्रकाश ठरतो फायदेशीर, आहेत आणखीही फायदे
ऊन किंवा सूर्यप्रकाश तुमची सर्केडियन लय (रिदम) सेट करण्यास मदत करते , ज्यामुळे सेरोटोनिन नावाचा एक विशिष्ट हार्मोन देखील ट्रिगर होतो. सेरोटोनिन तुम्हाला चांगल्या मूडमध्ये ठेवते.
नवी दिल्ली – संपूर्ण उत्तर भारतात सध्या कडाक्याच्या थंडीच्या (cold) प्रभावाखाली आहे. या हिवाळ्यात थोडेसे ऊन मिळणेही दुरापास्त असते. पण सूर्यकिरणांचा आपल्या मनावर खोल प्रभाव पडतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? युरोपमध्ये असे अनेक देश आहेत, जिथे थंडीमुळे दाट धुके आणि बर्फवृष्टी होते. यामुळेच तिथले लोक सीझनल अॅफेक्टिव्ह डिसऑर्डरशी ( Seasonal Affective Disorder) लढत असतात. सूर्याची किरणे (sunlight) ही आपल्या मानसिक आरोग्यासाठी (mental health) खूप फायदेशीर असतात. कोरोना महामारीच्या काळात बहुतांश लोकांना मानसिक ताण-तणाव, स्ट्रेस यासारख्या समस्यांचा सामना करावा लागला, त्यानंतर अनेक लोक त्यांच्या मानसिक आरोग्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देऊ लागले.
सूर्याची किरणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहेत हे जाणून घेऊया.
सूर्यप्रकाश कसा ठरतो फायदेशीर ?
ऊन किंवा सूर्यप्रकाश आपली सर्केडियन लय (रिदम) सेट करण्यास मदत करते , ज्यामुळे सेरोटोनिन नावाचा एक विशिष्ट हार्मोन देखील ट्रिगर होतो. सेरोटोनिन आपल्याला चांगल्या मूडमध्ये ठेवते, शांत वाटतं आणि फोकस (एकाग्रता) वाढतो. उन्हात बसल्याने तणाव, दुःख, एकटेपणा दूर होण्यास मदत होते. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल, प्रेरणेचा अभाव किंवा आळशीपणा वाटत असेल तर सूर्यप्रकाशात बसून तुम्हाला या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
सूर्यप्रकाशामुळे मिळते व्हिटॅमिन डी
सूर्यप्रकाशामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी3 मिळते. हे आपल्या मूड रेग्युलेशनमध्ये (नियमन) महत्वपूर्ण भूमिका बजावते. सूर्यप्रकाशातील शक्तिशाली इन्फ्रारेड किरणांमुळे जळजळ कमी होते, झोपेची पद्धत सुधारते आणि सेरोटोनिन सोडल्याने आपला मूडही सुधारतो. सूर्यप्रकाशामुळे आपला तणाव तर कमी होतोच, पण त्याचा आपल्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो.
घरी लावा पेंटिग
कलर थेरपीमुळेही आपला ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही घरात बहुरंगी पेंटिंग्स लावू शकता, जे पाहून तुमच्या मनाला चालना मिळेल. सूर्यकिरणांपासून जसा लाभ होतो, तसाच फायदा पेंटिगमधून मिळू शकेल.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)