मानसिक स्वास्थासाठी सोशल मीडिया ठरतोय ‘स्लो पॉइजन’! सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा

तुम्ही देखील नकळत सोशल मीडियाचे व्यसनाधीन झालेले आहात का? तर मग ते तुमच्या मानसिक स्वास्थावर काय परिणाम करत आहे ते जाणून घ्या.

मानसिक स्वास्थासाठी सोशल मीडिया ठरतोय 'स्लो पॉइजन'! सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा
सोशल मिडीया Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 5:42 PM

मुंबई,  कोरोना महामारीनंतर सोशल मीडियाचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. सोशल मीडियाच्या (Social Media) वापरामुळे आपल्या आरोग्यावर तसेच आपल्या जीवनावर पिपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया मानसिक स्वास्थासाठी (Mental Health) ‘स्लो पॉइजनिंग’चे (Slow Poisoning) काम करत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू झाल्याने लोकांचा सोशल मीडियाकडे अधिक कल वाढला आणि आता त्याचे धक्कादायक परिणाम दिसू लागले आहेत. सोशल मीडियाच्या अतिवापराने अनेक भावनिक पैलू नष्ट केले आहेत आणि अनेक मानसिक समस्यांना जन्म दिला आहे. दरम्यान, जर्मनीतील बोचम येथील रुहर युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वाढत्या वापरावर संशोधन केले आणि या बदलाचा मानवी जीवनावर किती परिणाम झाला हे शोधून काढले.

मानसिक आरोग्यावर सोशल मीडियाचा प्रभाव

संशोधकांनी सांगितले की, मानसिक आरोग्य हे सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन परस्परसंबंधित पैलूंवर अवलंबून असते. तज्ज्ञांनी याबद्दल सावध केले की सोशल मीडियाचा अतिवापर केल्याने परस्पर बंध कमकुवत होतात आणि एखाद्या व्यक्तीच्या मनावर खोलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

सोशल मीडियामध्ये काही मर्यादा घालायला हव्यात, असे तज्ज्ञांचे मत आहे. अनेक सज्ञान लोकंही सोशल मीडियाच्या जाळ्यात नकळतपणे सोशल मिवोडीयाच्या जाळ्यात गुंतले गेले आहेत. आनंद मिळविण्यासाठी सोशल मीडिया हा एकमेव पर्याय नाही हे समजणे फार महत्त्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

व्यायामाचा मेंदूला कसा फायदा होतो

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते  कोणत्याही प्रकारच्या मानसिक आजारात व्यायामाची शिफारस केली जाते. व्यायाम केल्याने मानसिक स्वास्थ तर सुधारतेच  शिवाय सोशल मीडियापासून दूर राहण्यास देखील मदत होते. वैद्यकीय उपचार सुरु असल्यास औषधांचा प्रभाव देखील वाढतो.

सर्वेक्षणात काय समोर आले?

ज्यांनी शारीरिक हालचालींमध्ये जास्त वेळ घालवला त्यांच्या मानसिक आरोग्याच्या परिणामांमध्ये सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणाऱ्यांपेक्षा नकारात्मक मानसिक आरोग्यामध्ये घट झाल्याचे दिसून आले.

याशिवाय संशोधकांनी त्यांच्या प्रयोगातून कोविड-19 मुळे होणारा ताण आणि धूम्रपानाचे सेवन कमी करण्याचे आवाहन केले आहे. या संशोधनासाठी एकूण 642 प्रौढ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. या सर्व लोकांची 4 गटात विभागणी करण्यात आली होती.

सोशल मीडिया ग्रुपमध्ये 162 व्यक्ती, 161 जणांचा शारीरिक क्रियाकलाप गट, 159 जणांचा संयोजन गट आणि 160 जणांचा कंट्रोल ग्रुप होता. 2 आठवड्यात, सोशल मीडिया ग्रुपने त्यांचा दैनंदिन सोशल मीडिया वापराचा वेळ 30 मिनिटांनी कमी केला आणि  त्यांच्या दैनंदिन शारीरिक हालचाली 30 मिनिटांनी वाढवल्या. संयोजन गटाने दोन्ही बदल लागू केले, तर नियंत्रणाने त्याचे वर्तन बदलले नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.