Fridge Disadvantages : तुमच्याकडे प्रत्येक पदार्थाची होते फ्रीजमध्ये रवानगी ? हे पदार्थ चुकूनही फ्रीजमध्ये ठेऊ नका
आपला रेफ्रिजरेटर हा भाज्या आणि फळं सुरक्षित ठेवण्याचे काम करतो. तसेच ते लवकर खराब होण्यापासूनही वाचवतो. पण सर्वच फळे आणि भाज्या फ्रीजसाठी बनवलेल्या नसतात, काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकतात.
नवी दिल्ली : आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून तापमान वाढू लागले आहे. वातावरणातील उष्णता (summer heat) जास्त होताच भाजीपाला व इतर खाद्यपदार्थ खराब होण्याचा धोका असतो. जेव्हा फ्रीजची (fridge) व्यवस्था नव्हती, तेव्हा फळे आणि भाज्या उष्णतेपासून वाचवण्यासाठी लोक थंड पाण्याचा वापर करत होते. मात्र फ्रीजची उपलब्धता आणि वीजेची उपलब्धता वाढल्यानंतर परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. अति उष्णतेमध्ये पदार्थ 4 ते 6 तासांत खराब होण्याची शक्यता असते. पण तेच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होत नाही. पण सर्व पदार्थ फ्रीजसाठी (food in fridge) बनवलेल्या नसतात, काही भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने खराब होऊ शकतात.
फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेऊ नयेत ते जाणून घेऊया.
1) फ्रीजमधील बटाट्यामुळे कॅन्सरचा धोका असतो
बटाटे फ्रीजमध्ये ठेवण्यास मनाई आहे. त्यामागील कारण म्हणजे फ्रीजच्या तापमानामुळे बटाट्याचा स्टार्च तुटतो. त्यामुळे बटाट्याचा गोडवा वाढतो. फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे शिजल्यावर त्यातून ॲक्रिलामाइड हे घातक रसायन बाहेर पडते. ते खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका असतो. म्हणूनच बटाटे सूर्यप्रकाशापासून वाचवून ते उघड्यावर, मोकळ्या हवेत ठेवावेत.
2) सॉस, जॅम, जेली फ्रीजमध्ये ठेवू नका
सॉसमध्ये विनेगा आणि प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर केला जातो. हे सॉस खराब होण्यापासून वाचवण्यास मदत करतात. जरी सॉस उघडून ठेवला तरी तो खराब होण्याची काळजी करू नका. जॅम आणि जेली देखील फ्रीजमध्ये ठेवू नये.
3) गोठू शकते कॉफी
कॉफी फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नये. यामुळे कॉफी घनरूप होऊन गोठते. कॉफी ठेवण्यासाठी हवाबंद डब्याचा वापर करावा. त्यामुळे त्याची चव आणि वास कायम राहतो.
4) पिकत नाही केळं
केळी ही नेहमी पिकल्यावरच खावीत. उच्च तापमान केळी पिकण्यास प्रतिबंध करते. म्हणूनच त्यांना सामान्य तापमानात ठेवा. त्यामुळे केळी सहज पिकते. म्हणूनच केळी कधीच फ्रीजमध्ये ठेऊ नयेत.
5) खराब होऊ शकतात टोमॅटो
अनेकांना टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवायला आवडतात. पण तसे करू नये कारण जेव्हा टोमॅटो थंड तापमानाच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांची चव आणि पोत खराब होण्याची शक्यता असते. टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी बाहेर सामान्य तापमानात ठेवावेत.
6) काकडी ठेऊ नका
फ्रीजमध्ये काकडी ठेवणे टाळा. यामुळे काकडीचे वरचे साल खराब होते. काकडी सामान्य तापमानात ठेवल्यास ती अधिक दिवस चांगली व सुरक्षित राहते.
7) ब्रेडही फ्रीजमध्ये ठेवणे धोकादायक
फ्रिजमध्ये ब्रेड ठेवणे टाळा. ब्रेड सामान्य तापमानात उघड्यावर ठेवल्यास जास्त काळ टिकतो. पण फ्रीजमध्ये ते लवकर खराब होण्याचा धोका असतो.
8) कांदाही फ्रीजमध्ये ठेवू नका
कांद्याला हवेशीर पण थंड आणि कोरड्या जागेची आवश्यकता असते. कांदे फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यात ओलावा येऊ शकतो आणि त्यांना बुरशी लागू शकते. कांदा चिरलेला असेल तरच फ्रीजमध्ये ठेवावा.
9) मध क्रिस्टलाइज होऊ शकतो
मध हे नैसर्गिकरित्या संरक्षित अन्न आहे. सामान्य तापमानात ठेवल्यास त्याचे आयुष्य जास्त असते. खूप गरम किंवा खूप थंड तापमानात कधीही ठेवू नका. यामुळे मध क्रिस्टलाइज होऊ शकतो. त्यामुळे त्याचे नैसर्गिक गुणधर्म संपुष्टात येऊ लागतात.
10) लसूण देखील फ्रीजमध्ये ठेवणे टाळा
लसणाच्या पाकळ्या चिरून किंवा संपूर्ण असल्या तरी त्या फ्रीजमध्ये ठेवू नयेत. लसूण मऊ होऊन कोंब फुटू लागतात. त्याची चव कमी होते आणि जो लसणाचा फायदेशीर गुण आहे, तो संपू लागतो.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत.)