Sputnik V लस मुंबई-पुण्यात कधी दिली जाणार? लस कुठे आणि किती रुपयांना मिळणार?

Sputnik V Vaccine Registration भारतात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी दिल्या जातात. त्याचसोबत आता स्पुतनिक व्ही ही लसही दिली जाणार आहे.

Sputnik V लस मुंबई-पुण्यात कधी दिली जाणार? लस कुठे आणि किती रुपयांना मिळणार?
स्पुतिक वी लस
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 12:52 PM

मुंबई : अपोलो हॉस्पिटल आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी रशियाच्या स्पुतनिक-व्ही (Sputnik V) लसीबाबत कार्यक्रम हाती घेतला आहे. भारतात दाखल झालेली ही लस आता मोठ्या प्रमाणात भारतीयांना दिली जाणार आहे. भारतात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी दिल्या जातात. त्याचसोबत आता स्पुतनिक व्ही ही लसही दिली जाणार आहे. ( Sputnik Vaccine Registration, Efficacy, Price, Side Effects Covaxin vs Covishield all you need to know )

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात स्पुतनिक व्ही लस अपोलो रुग्णालयामध्ये सोमवारी हैदराबादेत आणि मंगळवारी 18 मे रोजी विशाखापट्टणमध्ये दिली जाईल.

रशियाची स्पुतनिक व्ही ही लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचं सिद्ध झालं आहे. शिवाय या लसीचा कोणताही साईड इफेडॉक्ट नाही. या लसीच्या निरीक्षणानंतर दोन महिन्यांनी म्हणजे एप्रिल महिन्यात आपत्कालिन वापराला भारताने मंजुरी दिली. स्पुतनिक व्ही या लसचे दोन्ही डोस हे एकमेकांपेक्षा वेगळे असतात हे त्याचं वैशिष्ट्य आहे.

दिल्ली-मुंबईसारख्या शहरात स्पुतनिक व्ही कधी मिळणार?  

डॉ. रेड्डीज लॅबोरेटीजने जारी केलेल्या पत्रकानुसार, तूर्तास तरी स्पुतनिक व्ही ही लस प्रायोगिक तत्वावर हैदराबाद आणि विशाखापट्टणम इथेच सुरु केली आहे. त्यानंतर ही लसीकरण मोहीम दिल्ली, मुंबई, बंगळुरु, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता आणि पुणे इथे सुरु करण्यात येईल.

स्पुतनिक व्ही लसीच्या एका डोससाठी किती रुपये?

स्पुतनिक व्ही या लसीची भारतातील किंमत जाहीर झाली आहे. त्यानुसार स्पुतनिक व्ही लसीच्या एका डोसची किंमत 948 रुपये अधिक 5 टक्के जीएसटी म्हणजे 995 रुपये इतकी आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाच्या मते, अपोलो रुग्णालयात स्पुतनिक व्ही या लसीसाठी 1250 रुपये द्यावे लागतील.

लसीबाबत पुढील नियोजन काय?

अपोलो रुग्णालयाच्या संचालिका संगिता रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरात अपोलो रुग्णालयाकडे 10 लाख डोस उपलब्ध होणार आहेत. त्या म्हणाल्या, “आम्हाला आनंद होतोय की अपोलो रुग्णालयाने भारतात उपलब्ध झालेली पहिली विदेशी लस स्पुतनिक व्ही साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजची निवड केली. नागरिकांच्या लसीकरणासाठी आम्हाला महिनाभरात 10 लाखांहून अधिक डोस उपलब्ध होतील” असं संगिता रेड्डी म्हणाल्या.

लसीकरणासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीचं तंतोतंत पालन केलं जाईल, असं रेड्डी यांनी म्हटलं. अपोलो रुग्णालयाचे अध्यक्ष हरी प्रसाद म्हणाले, या पायलट प्रोजेक्टच्या निमित्ताने डॉ. रेड्डीज आणि अपोलो व्यवस्थापनाच्या कोल्ड चेन लॉजिस्टिक्सचं परीक्षण करण्यास मदत होईल. आम्हाला विश्वास आहे की स्पुतनिक व्ही लसीसह आम्ही कोव्हिड वॅक्सिनची उपलब्धता आणि वितरण हे सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू”

स्पुतनिक व्ही

स्पुतनिक व्ही ही लस 91.6 टक्के प्रभावी आहे. ही लस रशियाने बनवली आहे. अमेरिकेत बनलेल्या फायजर आणि मॉडर्ना या लसी 90 टक्के प्रभावी आहेत. मात्र स्पुतनिक व्ही लसीने त्यापुढे मजल मारली आहे.

भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या लसी उपलब्ध आहेत. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस 81 टक्के प्रभावी आहे. तर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशील्ड ही लस 80 टक्के प्रभावशाली आहे.

संबंधित बातम्या 

स्पुतनिक लसीच्या एका डोसची किंमत किती?; डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून दर जाहीर

( Sputnik Vaccine Registration, Efficacy, Price, Side Effects Covaxin vs Covishield all you need to know )

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.