पोटाच्या विकारांपासून राहा दूर… आहारात ‘या’ सुपरफूडचा समावेश करा
आपल्या पोटात अनेक विषारी घटक साठतात. हे विषारी घटक एका विशिष्ट पध्दतीने शरीराच्या बाहेर टाकले जात असतात. मल व मुत्र विसर्जनसह घामाद्वारेही हे घटक शरीराच्या बाहेर टाकले जात असतात. परंतु त्यासाठी आपली पचनशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. पचनशक्तीच्या अभावी अनेकदा हे विषारी घटक शरीराबाहेर टाकले जात नाही.
मुंबई : अस म्हटलं जातं, की सर्व आजारांचे मुळ आपले पोट (stomach) असते. नियमित पध्दतीने पोट साफ ठेवल्यास अनेक आजार टाळता येऊ शकतात. त्यामुळे पोटाची सफाई अत्यंत आवश्यक असते. परंतु सध्या धावपळीच्या जगात योग्य व सकस आहार तसेच फायबरयुक्त घटकांचे सेवन करण्यास वेळ नसतो. त्यासोबतच व्यायामाचाही अभाव असल्याने याचा शरीरावर अनेकवेळा दुष्परिणाम होत असतो. जेवणात फायबरयुक्त घटकांचा समावेश नसल्याने पोट साफ होण्यास कठीण जाते. यासोबतच पोटातील आतड्यांमधील विषारी (toxins) घटकदेखील शरीराबाहेर काढण्यास अडचणी निर्माण होत असतात. या सर्वांचा परिणाम म्हणून पोटाचे अनेक विकार निर्माण होत असतात. हे सर्व विकार टाळायचे असल्यास काही अन्नघटक महत्वाची कामगिरी करु शकतात. त्यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्यास यातून शरीराला अनेक चमत्कारी फायदे मिळून आपली पचनशक्कीदेखील (Digestion) वाढण्यास मदत होत असते.
सफरचंद
पोटाच्या आतड्यांच्या सफाईसाठी सफरचंद अत्यंत गुणकारी आहे. यात फायबर असल्याने आपली पचनशक्तीदेखील वाढीस मदत होत असते. असे म्हणतात रोज एक सफरचंद खा आणि अनेक आजारांपासून दूर रहा, रोज एका सफरचंदाचा आपल्या आहारात समावेश केल्यास यातून शरीराला फायबरसह लोहदेखील मिळत असते. शिवाय यातून आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. उपाशीपोटी सफरचंद खाल्ल्याने पोटातील विषारीतत्व साफ होण्यास मदत होत असते. शिवाय छातीतील जळजळ, बध्दकोष्ठता आदी समस्याही यातून दूर होतात.
भाज्यांचा ज्यूस
टमाटा, पालक, काकडी, गाजर, बीट आदी फळभाज्यांचा ज्युस पोटाच्या अनेक विकारांपासून दूर ठेवण्यास मदत करत असतो. शिवाय आतड्यांमधील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यास हा ज्युस अत्यंत लाभदायक आहे. या शिवाय शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासही हा ज्युस फायदेशीर मानला जात असतो. टमाटा, काकडी, गाजर, बीट आदींमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असल्याने यातून पचनक्रिया सुधारण्यास मदत होते व शरीर हायड्रेड राहते.
फायबरयुक्त फळे
संत्री, सफरचंद, पेरु, पेर, आंबा आदी फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध असते. त्यांच्या सेवनामुळे पोटाची चांगली सफाई होते. या फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा संपूर्ण फळ खाल्ल्यास याचा अधिक फायदा शरीराला मिळतो. अनेक फळांच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर उपलब्ध होत असते. त्यामुळे मोठ्या आतड्यांची स्वच्छता होण्यास मदत मिळते.
लिंबू
लिंबूमध्ये मुबलक प्रमाणात सी जीवनसत्व असते. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू व मध मिसळून त्याचे सेवन केल्यास याचे चांगले फायदे शरीराला मिळत असतात. शिवाय यातून पचनशक्तीदेखील सुधारण्यास मदत होत असते. आपल्या रोजच्या आहारात लिंबूचा अवश्य वापर करावा.
(टीप : सदर मजकूर उपलब्ध माहितीच्या आधारावर तयार करण्यात आला आहे. याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)
संबंधित बातम्या :
Skin Care : काळ्या पडलेल्या त्वचेला नविन लकाकी आणण्यासाठी टोमॅटोचा वापर करुन नितळ त्वचा मिळवा!
Sabja seeds : जाणून घ्या सब्जाचे आरोग्यदायी फायदे, वाचा महत्वाची माहिती!