फुफ्फुसाच्या इजा व्यायामामुळे बऱ्या होऊ शकतात का? काय करायला हवं?

फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. व्यायाम फुफ्फुसांचे कार्य सुधारतो, श्वास घेण्याची क्षमता वाढवतो आणि रक्तप्रवाह सुधारतो. चालणे, पोहणे आणि स्ट्रेचिंग हे फुफ्फुसांसाठी फायदेशीर व्यायाम आहेत. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम जसे की डीप ब्रीथिंग, फुफ्फुसांना मजबूत करण्यास मदत करतात.

फुफ्फुसाच्या इजा व्यायामामुळे बऱ्या होऊ शकतात का? काय करायला हवं?
lung exerciseImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 12:04 PM

फुफ्फुस निरोगी तर शरीर निरोगी असं म्हटलं जातं. त्यामुळेच फुफ्फुसाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. फुफ्फुसाची योग्य काळजी घेतली नाही तर गंभीर आजाराचा धोका असतो. त्यामुळेच योग्य आहार आमि व्यायाम असणं महत्त्वाचं असतं. फुफ्फुसाला कधी कधी जखमा होतात. इजा होतात. त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यासाठी तात्काळ उपचार घेणं गरजेचं असतं. पण अनेकांना एक प्रश्न नेहमी पडतो. तो म्हणजे फुफ्फुसाच्या जखमा व्यायामाने बऱ्या होतात का? त्याचं काहीसं उत्तर होय आहे. औषधाप्रमाणेच व्यायाम करणंही तितकंच महत्त्वाचं असतं.

आपण पाठीवर पडलो आणि आपल्याला इजा झाल्यास त्याचा परिणाम फुफ्फुसावर होतो. जखमा झाल्याने रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे श्वास घ्यायला अडचणी होतात. अशा जखमांमुळे भविष्यात श्वसनाचा त्रास अधिकच मोठा होऊ शकतो. तसेच त्यानुषंगाने इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशावेळी या जखमा औषधाने बऱ्या होत नाहीत. त्यासाठी औषध हाच एकमेव पर्याय असतो. असं असलं तरी भविष्यात होणाऱ्या गंभीर समस्यांना टाळण्यासाठी व्यायामाचे महत्त्व अधिक आहे.

आपण श्वास घेत असताना प्रदूषित हवा आपल्या शरीरात जाते. सिगारेट ओढणे, वाढत्या वयामुळे फुफ्फुसांचा आकार कमी होतो. या सर्व समस्या व्यायामामुळे सुधारू शकतात. श्वासाच्या आरोग्यासाठी काही महत्त्वपूर्ण व्यायाम आहेत. चालणे, स्ट्रेचिंग आणि पोहणे या व्यायामांमध्ये श्वासाच्या आरोग्यासाठी फायद्याचे आहेत.

स्नायूंना ताकद

व्यायामामुळे तुमचे श्वास घेण्याचे स्नायू मजबूत होतात. शरीराची सहनशीलता सुधारते. त्यामुळे श्वास घेण्यात तुम्हाला आराम मिळतो आणि शरीर अधिक निरोगी बनते.

फुफ्फुसाच्या कार्यात सुधारणा

व्यायामामुळे श्वास घेत असताना शरीराची अधिक ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे फुफ्फुसाचे कार्य सुधारते. त्यामुळे श्वासाच्या समस्यांचे लक्षण कमी करण्यास मदत होते.

रक्तप्रवाह सुधारणा

व्यायाम करत असताना, तुमचे फुफ्फुस आणि हृदय एकत्र काम करतात आणि शरीरात ऑक्सिजन पोहोचवतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि फुफ्फुसांभोवती असलेल्या टिश्यूजला ताकद मिळते.

श्वसन व्यायाम

श्वास घेण्याचे व्यायाम :

श्वासाची अडचण असलेल्या व्यक्तींना श्वास घेण्याचे व्यायाम फायदेशीर ठरतात. पण, श्वासाच्या संरचनात्मक तुटणाऱ्यांसाठी (जसे की अ‍ॅस्मा, COPD इ.) व्यायामाने या समस्यांचा संपूर्णपणे निवारण होऊ शकत नाही. हे नैसर्गिकपणे श्वासोच्छ्वास प्रक्रिया आपल्या शरीरात होते.

तथापि, श्वासाच्या समस्या असलेल्या लोकांना प्राचीन श्वासोच्छ्वास प्रॅक्टिसेस जसे की पर्स्ड लिप ब्रीथिंग (श्वास घेतांना ओठ बंद करून श्वास बाहेर सोडणे) फायदेशीर ठरते. या पद्धतीमुळे श्वास निघू शकतो आणि फुफ्फुसांमध्ये सापडलेल्या गोळ्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.

दीर्घ श्वास :

दीर्घ श्वास (डीप ब्रीथिंग) व्यायाम, जो डाएफ्राम (पोटाच्या स्नायू) ला मजबूत करतो, त्याचे महत्त्व आहे. हे व्यायाम करण्यासाठी, तुमच्या एका हाताला छातीवर आणि दुसऱ्या हाताला पोटावर ठेवा. नाकाने खोल श्वास घ्या आणि पोट बाहेर थोडे फुगवा. हे 5 ते 20 वेळा करा. तुमच्या आरोग्याच्या स्थितीवर आधारित हे व्यायाम करावेत. यामुळे श्वासोच्छ्वासाची अडचण कमी होते आणि फुफ्फुसात हवा येण्याचे प्रमाण वाढते.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.