Stress Benefits: काय? तणाव शरीरासाठी चांगला असतो ? संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती
छोट्या तणावाचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो, हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आधुनिक जगात लहान-सहान ताणतणाव असणे खूप महत्त्वाचे आहे.
नवी दिल्ली – टेन्शन घेतल्याने टेन्शन (tension) वाढते, असे म्हटले जाते. म्हणूनच कामाच्या दरम्यानही कमी ताण (stress) घ्यावा, असा सल्ला डॉक्टर देतात. पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण एखादा ताण घेणे (stress is beneficial) चांगले असते. यामुळे मन तरुण राहते. एवढेच नव्हे तर म्हातारपण चांगल्या पद्धतीने पार करण्यास मदत होते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही माहिती समोर आली आहे. मात्र यापूर्वी, 90 च्या दशकात तणाव हा आरोग्यासाठी चांगला मानला जात नव्हता.
फिरदौस दाभर नावाच्या अमेरिकन मानसोपचार तज्ज्ञाने न्यूयॉर्कच्या रॉकफेलर युनिव्हर्सिटीच्या संशोधकाच्या सहकार्याने पहिल्यांदाच यावर अभ्यास केला आहे.
तणावामुळे वाढते रोगप्रतिकारशक्ती !
छोट्या तणावाचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर सकारात्मक प्रभाव पडतो, हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आधुनिक जगात लहान-सहान ताणतणाव असणे खूप महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ – एखाद्या धावपटूला आगामी स्पर्धेबद्दल थोडं दडपण येणं किंवा ताण येणं हे गरजेचं असतं. यामुळे हृदया आणि स्नायू मजबूत होतात. सौम्य शारीरिक आणि मानसिक तणावामुळे रक्तामध्ये इंटरल्यूकिन नावाचे रसायन तयार होते, जे रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय करते. हे संसर्गाशी लढा देण्यास मदत करते.
मेंदूचे वय कमी होते
नवीनत संशोधनानुसार, 40 वर्षांनंतर एका दशकात मेंदूचा आकार सुमारे 5 टक्के दराने कमी होतो. वयाच्या 70व्या वर्षानंतर घट होण्याचे प्रमाण आणखी वाढते. नियमित व्यायाम करणाऱ्या अशा मोठ्या व्यक्तींमध्ये मेंदू संकुचित होणे, 4 वर्षांनी कमी होते. 2013 च्या संशोधनानुसार, थोडा ताण घेतल्यास शरीरात कॉर्टिकोस्टेरॉन नावाचे स्ट्रेस हार्मोन तयार होतो, ज्यामुळे मानसिक क्षमता वाढते आणि एखादी गोष्ट शिकणे आणखी सोपे होते.
त्याशिवाय संशोधनावर विश्वास ठेवायचा झाला तर, मर्यादित प्रमाणातीस तणावामुळे शरीरातील अँटी-ऑक्सिडंट्स वाढतात, जे डीएनए आणि आरएनएचे संरक्षण करतात. पण तणाव वाढला किंवा जास्त झाला तर शरीरातील पेशींनाही त्याचे नकारात्मक परिणाम सहन करावे लागतात.
(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)