ऐकावं ते नवलंच! म्हणे निष्काळजीपणामुळे कमी होतो स्ट्रेस

असं म्हणतात की माणसाने चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात. पण एका अभ्यासानुसार वाईट सवयी या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

ऐकावं ते नवलंच! म्हणे निष्काळजीपणामुळे कमी होतो स्ट्रेस
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 10:30 AM

नवी दिल्ली – लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की चांगल्या सवयी (good habits) अंगी बाणवाव्यात. एखादी चुकीची गोष्ट केली तर आपल्याला ओरडा ऐकावा लागायचा. मुलांनी दातांनी नखं खाणं, केसांत बोटं फिरवत राहणं आणि सामान जागेवर न ठेवता पसारा करून ठेवणं अशा अनेक सवयी असतात. अशावेळी मोठी माणसं लहान मुलांना या वाईट सवयी (bad habits) सोडून देण्यास व चांगल्या सवयी अंगिकारण्यास सांगायचे. मात्र आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते वाचून तुम्हीही हैराण व्हाल. या वाईट सवयी आपल्या आरोग्यासाठी (effect on health) फायदेशीर मानल्या जातात.

नखं कापल्याने वाढते इम्युनिटी

आपल्यापैकी अनेक लोकांना दातांनी नखं कापायची सवय असते. वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, अशा रितीने नखं कापणे हे आरोग्यासाठी चांगले ठरते. यामुळे शरीरात नव्या बॅक्टेरियांची निर्मिती होते, ज्यामुळे भविष्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

हे सुद्धा वाचा

च्युइंगम खाणे

लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक जण च्युइंगम खाताना दिसतात. कदाचित या सवयीमुळे तुम्हाला इरिटेट होत असेल पण एका रिपोर्टनुसार, च्युइंगम खाल्ल्याने आपला फोकस वाढतो आणि बऱ्याच कालावधीपर्यंत लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तसेच स्मरणशक्ती तीक्ष्ण होण्यासही मदत होते.

गप्पा मारणे

गॉसिप करणारे लोक इतरांना फारसे आवडत नाहीत. पण गॉसिपिंग केल्याने स्ट्रेस म्हणजेच ताण-तणाव दूर होतो, हे तुम्हाला माहीत आहे

का ? भरपूर गप्पा मारल्याने तुमचा तणाव आपोआप कमी होतो.

बिनधास्त हसा

जे लोक नेहमी हसत असतात, त्यांच्याकडे इतर लोक कधीकधी वेगळ्याच दृष्टीने पाहतात. सतत खी-खी करणाऱ्या लोकांची एक वेगळी इमेज बनते. तुम्हालाही असं वाटत असेल तर हे नक्की वाचा. हसल्याने आणि इतर व्यक्तींशी गप्पा मारल्याने आनंद मिळतो. त्यामुळे जर तुम्हाला खुश रहायचं असेल तर बिनधास्तपणे हसा .

निष्काळजीपणामुळे ताण होतो कमी

काही लोकांना कुठेही उशीरा पोहोचण्याची सवय असते. शाळा, कॉलेज, ऑफिस असो वा घर, किंवा एखाद्या समांरभात जायचे असेल तरी हे लोक कधीच वेळेवर पोहोचत नाहीत. मात्र एका अभ्यासानुसार, जे लोक वेळेबाबत (वेळ पाळण्याबाबत) बेफिकीर असतात, त्यांना कमी स्ट्रेस असतो. ते इतरांपेक्षा निरोगी जीवनशैली जगतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....