साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!

पांढरीशुभ्र व अत्यंत मधुर वाटणारी साखर आपल्या शरीरात गेल्यावर आरोग्याला अत्यंत घातक ठरु शकते. साखरेचे अतिसेवन भविष्यात गंभीर आजारांना निमंत्रण देते. त्यामुळे साखरेचे अतिसेवन टाळले पाहिजे. साखरेमुळे, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकारासह अनेक आजार निर्माण होत असतात.

साखर पोटात गेल्यावर दाखवते मोठा ‘प्रताप’, मधुमेहापासून ते कर्करोगापर्यंत धोका!
साखरेचे दुष्परिणाम
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 8:34 PM

मुंबई : अनेक लोक आपल्या रोजच्या आहारात (Diet) मोठ्या प्रमाणात साखरेचा (Sugar) तसेच साखरेपासून तयार झालेल्या गोड अन्नघटकांचा समावेश करीत असतात. ते चिभेला तात्पुरत्या स्वरुपाच छान लागत असले तरी याचे दीर्घकालीन परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागत असतात. साखरेच्या अतिसेवनामुळे तुम्ही अनेक गंभीर स्वरुपांच्या आजारांना निमंत्रण देत असतात. मिठाई, साखरेपासून तयार जिलेबी, लाडू तसेच साखरेचे जास्त प्रमाण असणारी फळे आदींचे सेवन तुमच्या आरोग्याला अत्यंत घातक ठरु शकते. साखर हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत धोकेदायक घटक आहे. साखरेमुळे लठ्ठपणा, मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब, ह्रदयविकार आदी विविध आजार होउ शकतात.

वाढत्या वजनाची समस्या

अनेकांचे वजन विविध आजारांमुळे वाढण्याची शक्यता असते. असे असले तरी वजन वाढण्यामागे साखरेचे अतिसेवन हेदेखील एक सामान्य कारण असू शकते. साखरेच्या अतिरेकामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होत असते. जास्त प्रमाणात साखर असलेली फळे किंवा कार्बोहायड्रेट्ससह साखर असलेली प्रत्येक गोष्ट वजन वाढीला कारणीभूत ठरत असते.

हृदयविकाराचा धोका

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार साखरेमुळे हृदयविकाराचा धोका तीस टक्क्यांनी वाढत असतो. साखरयुक्त घटकांचा अतिवापर केल्यास यातून लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब व परिणामी ह्रदयविकाराचा धोका निर्माण होत असतो. अनेक जणांच्या आहारात मिठाईसह साखरेपासून तयार घटकांचा जास्त वापर असतो. यातून अनेक समस्या निर्माण होत असतात.

टाइप 2 मधुमेहाचा धोका

एका अभ्यासानुसार, जीवनशैलीशी संबंधित 90 टक्के आजारांमागे साखर हे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तुम्ही संतुलित प्रमाणात साखर खाल्ली तरीही ही काहीना काही प्रमाणात शरीराला धोकेदायकच ठरत असते. आपल्या आहारातून साखरेला पूर्णपणे हद्दपार करावे.

कर्करोगाचा धोका

साखरेमुळे शरीरात कर्करोगाचा धोका आणि शक्यताही वाढते. साखरेमुळे यूफोजीची प्रक्रिया मंदावते. ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपल्या शरीरातील लढाउ पेशी खराब पेशींचा प्रतिकार करीत असतात. जेव्हा ही प्रक्रिया थांबते आणि खराब पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात, तेव्हा तेथून कर्करोग सुरू होतो.

नैराश्याचा धोका

साखरेचे सेवन केल्यावर इन्सुलिनची पातळी वाढते, यातून रक्तात साखरेचे प्रमाण जास्त वाढत जाउन मधुमेह होतो. शिवाय साखरेच्या अतिरेकाने नैराश्याचा धोकादेखील निर्माण होत असतो. याशिवाय अकाली वृध्दत्व येण्यामागेही साखर एक प्रमुख कारण आहे.

मुरुम व पुरळ येणे

साखरेचे जास्त सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त वाढते. त्यातून अंगावर मुरुम आणि पुरळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासह त्वचेशी संबंधित अनेक आजार यातून निर्माण होत असतात.

इतर बातम्या :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.