आंबा खायला खूप आवडतो ? पण या फूड कॉम्बिनेशनसह आंबा खाणं पडेल भारी, कधीच खाऊ नका हे पदार्थ

आंबा खाण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण त्यासोबत काही पदार्थ खाणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते. काही अशी फूड कॉम्बिनेशन्स आहेत, जी आंब्यासोबत वापरू नये.

आंबा खायला खूप आवडतो ? पण या फूड कॉम्बिनेशनसह आंबा खाणं पडेल भारी, कधीच खाऊ नका हे पदार्थ
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 4:39 PM

नवी दिल्ली : उन्हाळ्यात (coolness in summer) गार वाटावं यासाठी लोकं अनेक मार्गांचा अवलंब करतात, ज्यामध्ये वॉटर पार्कमध्ये मजा करण्यासारख्या क्रियांचाही समावेश होतो. अनेकांना उन्हाळा केवळ आंब्यांसाठी (mangoes) आवडतो. आंब्यापासून बनवलेल्या गोष्टी खाऊन या ऋतूचा आनंद लुटणारे अनेक खाद्यप्रेमी आहेत. काही जण आंब्यासाठी उन्हाळा येण्याची वाट पाहत असतात. आंबा हा त्याच्या चवीमुळे प्रौढ आणि लहान मुलांचा सर्वांचाच आवडता आहे, पण त्याचा शरीराला फायदाही होतो. यामध्ये व्हिटॅमिन सी सारखा महत्त्वाचा घटक असतो जो शरीराला उष्णतेपासून वाचवण्यास मदत करतो.

आंबा खाण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण त्यासोबत काही पदार्थ खाणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते. काही अशी फूड कॉम्बिनेशन्स आहेत, जी आंब्यासोबत वापरू नये.

आंबा व दही

उन्हाळ्यात दही भरपूर सेवन केले जाते कारण ते पोट शांत ठेवते आणि आरोग्यासाठी फायदे देखील देते. काही लोक आंबा दह्यात मिसळून खातात. रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही गोष्टींमुळे पोटात विष निर्माण होऊ शकते. अशा प्रकारे, सेवन केल्यास उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या सुरू होते. दही खाल्ल्यानंतर साधारण अर्धा तास आंबा खाणे टाळावे. अन्यथा शरीरात ॲलर्जी निर्माण होऊ शकते.

आंबा आणि आईस्क्रीम

उन्हाळ्यात, लोक आंबा आणि आईस्क्रीमचे कॉम्बिनेशन देखील ट्राय करतात. खाण्याची ही पद्धत चवीला रुचकर असली तरी आरोग्याला हानी पोहोचवू शकते. थंड आणि गरम असल्याने, हे कॉम्बिनेशन तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.

लिंबू आणि आंबा

आंब्याची चव वाढवण्यासाठी अनेक वेळा लोक त्यात लिंबू किंवा इतर लिंबूवर्गीय पदार्थ घालतात. यामुळे शरीराची पीएच पातळी बिघडू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे करणे टाळावे, अन्यथा शरीराला त्रास होऊ शकतो.

रोजच्या जेवणासह आंब्याचे सेवन

बहुतेक लोकांना रोजच्या जेवणात, म्हणजे पोळी, भाजी व इतर जेवणासोबत आंबे कापून खायला आवडतात. मात्र असे केल्याने पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पचनशक्ती कमकुवत होऊ शकते. पोटदुखी किंवा इतर समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.