गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा… पण सतत सनग्लासेस लावाल तर पस्तावाल

गॉगल किंवा सनग्लासेस तरुणांमध्ये सर्वात कूल ॲक्सेसरी मानली जाते. मात्र त्याचा सतत वापर केल्याने अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळते.

गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा... पण सतत सनग्लासेस लावाल तर पस्तावाल
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 11:57 AM

नवी दिल्ली : गॉगल किंवा सनग्लासेस (sunglasses) तरुणांमध्ये सर्वात कूल ॲक्सेसरी मानली जाते. पण काही लोक गरज नसतानाही त्याचा वापर करतात. पण ते सतत वापरल्याने शरीराच्या सर्केडियन लयीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि विविध आरोग्य समस्या (health problems) उद्भवू शकतात. साधारणपणे, सनग्लासेस सूर्यप्रकाश आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण (protection of eyes) करतात. परंतु त्यामुळे तुमचे हार्मोन्स असंतुलित होऊ शकतात आणि त्यामुळे निद्रानाश आणि नैराश्यासारखे आजार होऊ शकतात, हे तुम्हाला माहिती आहे का ?

सनग्लासेस बद्दल तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया.

ग्रंथींवर होतो विपरीत परिणाम

हेल्थ ऑप्टिमायझिंग बायोहॅकर, मानसशास्त्र विशेषज्ञ, उद्योजक आणि ग्लोबल स्पीकर टिम ग्रे म्हणतात, “पूर्ण वेळ डोळ्यांवर सनग्लासेस लावल्याने पिनियल ग्रंथीवर वाईट परिणाम होतो. यामुळे मेंदूला असा सिग्नल पाठवला जातो की बाहेर ढगाळ वातावरण आहे आणि ते त्वचेला सूर्यप्रकाशाच्या एक्सपोजरपासून रोखण्याचा प्रयत्न करते.”

टिम ग्रे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘दिवसाच्या वेळी, सूर्यापासून एक निश्चित वेवलेंग्थ डोळ्यापर्यंत पोहोचते ज्यामुळे पिट्यूटरी आणि पिनियल ग्रंथीवर परिणाम होतो आणि मेंदूला वाटते की बाहेर सूर्यप्रकाश आहे. यानंतर, त्वचा थेट सूर्यप्रकाशासाठी तयार होते आणि व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी तयार होते.

आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सनग्लासेसमुळे सर्केडियन लय बिघडू शकते, ज्यामुळे तणाव, निद्रानाश आणि नैराश्य देखील येऊ शकते.

मूड बदलतो

सूर्यप्रकाशाचे महत्त्व सांगताना टिम ग्रे म्हणाले की, ते तुमच्या पिनियल ग्रंथीशी जोडलेल्या मेंदूतील हायपोथालेमसला उत्तेजित करून तुमचे हार्मोन्स नियंत्रित करण्यात मदत करू शकते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा तुमचे डोळे नैसर्गिकरित्या सूर्यप्रकाश शोषत नाहीत, तेव्हा तुमचे हार्मोन्सचे चक्र बदलतात. यामुळे तुमची शरीर प्रणाली आणि मूडही बदलतो.

‘यामुळे तुमचे डोळे थकतात कारण त्यांना नैसर्गिक प्रकाशासाठी खूप मेहनत करावी लागते. याचा काहीवेळा दृष्टीवरही परिणाम होतो. स्कीइंग करताना, पाण्यात असताना किंवा ड्रायव्हिंग करताना, धूळ टाळण्यासाठी सनग्लासेस वापरले जाऊ शकतात. पण ते काही दररोज अथवा दिवसभर वापरण्याची गोष्ट नाही, असेही टिम ग्रे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.