मधुमेह वाढल्यामुळे त्रस्त आहात? स्वयंपाकघरातील ‘हे’ सुपरफूड्स तुमच्यासाठी ठरतील संजीवनी… एकदा नक्की करा ट्राय
अनेकांना जेवल्यानंतर गोज पदार्थ खाण्याची सवय असते. परंतु, जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. मिठाई खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह होऊ शकतो. आजकाल लहानमुलांमध्ये देखील मधुमेहांचे रुग्ण दिसून येतात. चला तर जाणून घेऊया मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी नेमकं काय करावे?
तज्ञांनुासार, जास्त प्रमाणात गोड पदार्थांचं सेवन करणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. परंतु आपल्यामधील अनेकांना मिठाई खाण्यास आवडते. जास्त प्रमाणात गोड पदार्थांचे किंवा मिठाईचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीमध्ये जास्त प्रमाणात अतिरिक्त चरबी वाढते. त्यासोबतच गोड खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यास अडचण होऊ शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील गोड पदार्थांचे सेवन धोकादायक ठरते. मिठाईच्या सेवन केल्यास रक्तामधील साखरेची पातळी वाढते. चला तर जाणून घेऊया तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरेल.
अनेकजण दररोज जेवणानंतर त्यांच्या आवडीचा गोड पदार्थ खातात. अनेकांना मधुमेहाची समस्या असते पण त्यांना मिठई खाण्यास प्रचंड आवडते. अशा लोकांसमोर कोणत्याही प्रकारची मिठाई ठेवली तरी त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु हिच मिठाई तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरली तर. असे अनेक उपाय आहेत जे केल्यामुळे तुम्ही गोड खाण्याच्या सवयीवर ताबा मिळवू शकता.
या पदार्थांचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रित राहातो
चिया सिड्स
चिया सिड्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि इतर पोषक घटक असतात ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते. फायबरमुळे तुम्हाला जास्त भूक लागत नाही आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित रहाते. त्यासोबतच ओमेगा-३ फॅटी ॲसिड मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
बेरी
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर आढळते ज्याचे सेवन केल्यास शरीराला योग्य प्रमाणात साखर मिळते. त्यासोबतच बेरीजमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि जीवनसत्त्वे आढळतात. बेरीमधील अँटिऑक्सिडंट्स तुमचं आरोग्य आणि त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
पिस्ता
ड्राय फ्रूट्समधील पिस्ता अनेकांना आवडतो. पिस्ता खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यासोबतच पिस्तामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. पिस्ता नियमित खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला हेल्दी फॅट्स योग्य प्रमाणात मिळतात आमि तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, जे तुमच्या आरोग्य निरोगी ठेवतात. डार्क चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होते. मात्र, डार्क चॉकलेट कमी प्रमाणातच खावे.
मधुमेहाच्या रुग्णांनी या गोष्टी नक्की करा
मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात पाणी प्यावे. यामुळे तुमचे शरीर हायड्रेट रहाते आणि जास्त भूक लागत नाही. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचे असते. तुमच्या शरीराला योग्य आराम आणि पुरेशी झोप मिळाल्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी रहाण्यास मदत होते. दररोज सकाळी नियमित ध्यान केल्यामुळे तुमच्या मेंदूमधील ताण कमी होतो आणि दिवसभर तुम्ही उत्साही राहाता. तुमच्या दैनंदिन आहारामध्ये जास्त प्रमाणात प्रोटिन आणि फायबरचा समावेश करा यामुळे रक्तामदील साखर नियंत्रित राहाते. मार्केटमधील प्रोसेस्ड पदार्थांचे सेवन टाळा. या पदार्थांमध्ये साखरेची मात्रा जास्त प्रमाणात असते.