Nanded | मधुमेहाच्या रुग्णांसाठी गोड बातमी, नांदेड विद्यापीठाने काढले स्वस्तातील औषध…
सध्या जगामध्ये सर्वाधिक मधुमेहाचे रूग्ण हे चीनमध्ये आहेत. मात्र, भारतामधील मधुमेहाची संख्या वाढतच आहे. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक आैषधे बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तसेच मधुमेहावर वेगवेगळे संशोधन (Research) केले जाते. नुकताच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलात मधुमेहावर एक प्रभावी आैषध शोधण्यात आले आहे.
नांदेड : मधुमेह (Diabetes) असलेल्या रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. मधुमेहाची लागण होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये मुख्य म्हणजे खराब जीवनशैली. मधुमेह ही भारतासाठी अत्यंत धोकादायक घंटा आहे, कारण मधुमेहाच्या रूग्णांची संख्या विशेष करून भारतामध्ये (India) झपाट्याने वाढताना दिसते आहे. सध्या जगामध्ये सर्वाधिक मधुमेहाचे रूग्ण हे चीनमध्ये आहेत. मात्र, भारतामधील मधुमेहाची संख्या वाढतच आहे. मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक आैषधे बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तसेच मधुमेहावर वेगवेगळे संशोधन (Research) केले जाते. नुकताच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलात मधुमेहावर एक प्रभावी आैषध शोधण्यात आले आहे.
औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये केले संशोधन
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामधील प्रो. शैलेश वढेर आणि त्यांच्या टीमने मधुमेह बरा होण्यासाठी एक शोध लावला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पेटंट मिळाले आहे. हे औषध अगदी माफक दरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अगदी सामान्य रुग्णांना हे परवडणारे आहे. यामुळे आता मराठवाड्यातील मधुमेहाच्या रूग्णांचे टेन्शन कमी होणार आहे. आजकाल मधुमेह हा सामान्य विकार झाला आहे. कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड हे मधुमेह विरोधी औषध आहे. व्यावसायिक दृष्ट्या कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड लिपीड खूप महाग आहे. यासाठी कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्डचे प्रो. शैलेश वढेर यांच्या टीमने तयार केले आहे.
मधुमेहावरील प्रभावी अत्यंत आैषध
कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्ड लिपीड वाहक सामान्य पाण्यात विरघळणारे औषध आहे. कॅनाग्लीफ्लोझिन नॅनोस्ट्रक्चर्डची विद्राव्यता आणि जैवविविधता वाढविण्यासाठी डिझाईन तयार करण्यात आलेले आहे. यासाठी प्रो. शैलेश वढेर यांच्या टीममध्ये डॉ. सुरेंद्र गट्टाणी, आणि डॉ. श्रद्धा एस. तिवारी यांचा समावेश आहे. या त्यांच्या अतुलनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने यांनी डॉ. शैलेश वढेर व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.