Swollen Feet : पायांना येणारी सूज दर्शवते या आजाराचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

जेव्हा किडनीत पुरेसे सोडियम नसते, तेव्हा तिचे कार्य योग्यरित्या होत नाही. अशा स्थितीत पायात सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.

Swollen Feet : पायांना येणारी सूज दर्शवते या आजाराचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 3:11 PM

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023  : आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव महत्त्वाचा असतो. कोणताही आजार आला की शरीर त्याचे संकेत (signs in body) देऊ लागते. हे समजून घेऊन त्यावर योग्य वेळी उपचार करून घेतल्यास गंभीर आजारांपासून वाचू शकतो. असेच एक लक्षण म्हणजे पाय सुजणे (Swollen Feet). पायांना सूज येणे हे किडनी (kidney) खराब असण्याचे लक्षण असते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे. तसेच शरीराच्या या भागांमधूनही किडनीचा आजार ओळखता येतो.

या लक्षणांवरून जाणून घ्या किडनीची तब्येत

पायांना सूज

पायांवर किंवा टाचांवर सूज आली असेल तर किडनीच्या आजाराचे संकेत असू शकतात. खरंतर, किडनीमध्ये पुरेशा प्रमाणात सोडियम नसेल तर तिचे कार्य योग्यरित्या चालत नाही. अशा वेळी पायांवर सूज येऊ शकते. अशी लक्षणं दिसल्यास त्वरित सावध व्हावे.

लघवीतून फेस आणि बुडबुडे येणे

लघवीमध्ये फेस येणे किंवा बुडबुडे तयार होत असतील तर याचा अर्थ मूत्रात प्रोटीन लीक होत आहेत. हे देखील किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते. अशी काही लक्षणे दिसली तर त्वरित सावधगिरी बाळगावी

वारंवार लघवी लागणे

वारंवार लघवी होणे हे देखील किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. मात्र, सतत लघवी होणे हे इतर रोगांचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डोळ्यांजवळ सूज येणे

जेव्हा किडनी पोषक द्रव्ये नीट फिल्टर करू शकत नाही, तेव्हा लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन बाहेर पडू लागतात. त्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागात सूज येऊ लागते. अशा वेळी सतर्क होऊन वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मसल पेन

किडनीचे कार्य नीट सुरू नसेल तर तेव्हा शरीरात इलेक्ट्रोलाइट असंतुलन होते. अशा परिस्थितीत कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता असते आणि स्नायूंमध्ये वेदना देखील वाढतात. हे सुद्धा किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे.

पायांवर सूज आल्यास काय करावे ?

पायांना सूज आली असेल तर जास्तीत जास्त पाणी प्यावे. यामुळे, किडनी सहजपणे शरीरातून सोडियम काढून टाकू शकतात आणि मॅग्नेशियमचे ऑब्झर्व्ह करू शकतात. असे केल्याने किडनीचे कार्य सुरळीत राहते. अनेकदा जेव्हा पायांना सूज येण्याची समस्या असते तेव्हा लोक पाणी पिणे कमी करतात, जे चुकीचे आहे. म्हणूनच पाणी पिणे आणि फळे आणि भाज्या खाणे आवश्यक आहे. त्यामुळे किडनीचे काम व्यवस्थित होण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.