Double Mask | हवेतून कोरोना पसरण्याचा धोका अधिक, दोन मास्क वापरण्याचा टास्क फोर्सचा सल्ला

दोन मास्कचा वापर करा, असे आवाहन राज्याच्या टास्क फोर्सकडून करण्यात आलं आहे. (Task Force Suggest to Wear Two Mask for covid-19)

Double Mask | हवेतून कोरोना पसरण्याचा धोका अधिक, दोन मास्क वापरण्याचा टास्क फोर्सचा सल्ला
मास्क
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 8:50 AM

मुंबई : देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रसार हा हवेद्वारे होत आहे, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मेडिकल जर्नल Lancet च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर दोन मास्कचा वापर करा, असे आवाहन राज्याच्या टास्क फोर्सकडून करण्यात आलं आहे. (Task Force Suggest to Wear Two Mask for covid-19)

राज्य टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर अवघड काळात दुहेरी मास्क घालणे गरजेचे आहे. त्यामुळे विषाणूपासून सरंक्षण होऊ शकते. तसेच तुम्हाला संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. जेव्हा एखादा व्‍यक्‍ती एका मास्‍कवर दुसरा मास्‍क घालते तेव्‍हा त्‍याला दुहेरी मास्‍क घालणे असे म्हणतात. यामुळे बाहेरील मास्क हा आतील मास्कमुळे आपले तोंड पूर्णपणे कव्हर होते. त्यामुळे कोरोनापासून सरंक्षण होण्यास मदत होते.

दोन मास्क कधी आणि कुठे घालावे?

  • लोकल ट्रेन, बस स्टॉप, विमानतळ यासारख्या गर्दीच्या ठिकाणी दोन मास्कचा वापर करा.
  • तसेच सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी दोन मास्कचा वापर करा.
  • त्यासोबतच अंत्यत गर्दीच्या ठिकाणी मास्कसोबत फेसशिल्ड वापरा.
  • लहान मुलांनी दोन मास्क लावणे टाळा.
  • वापरलेले मास्क दररोज धुवा
  • तुमचे नाक, तोंड, पूर्णपणे झाकले जाईल, असाच मास्क वापरा.
  • मास्क शेअर करु नका.
  • मास्क काढल्यावर हात सॅनिटाईज करा.
  • काही वेळाने मास्क बदला.

कोरोनाचा प्रसार हवेतून वेगाने, Lancet चा दावा

कोरोनाचा प्रसार हा हवेद्वारे होत आहे, असा धक्कादायक दावा प्रसिद्ध मेडिकल जर्नल Lancet च्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याची गरज आहे, असे यात म्हटलं आहे. हा अहवाल इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ञांनी तयार केला आहे. कोरोना विषाणू हवेत पसरत नाही, हे सिद्ध करण्यासाठी सध्या तरी कोणतेही पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे शास्त्रज्ञांचाही यावर विश्वास नाही. त्यामुळे नव्या अहवालानुसार काही तज्ज्ञांनी कोविड 19 च्या सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये त्वरित बदल करावे, अशी सूचना केली आहे.

जगातील प्रसिद्ध मेडिकल जर्नल द लान्सेटमध्ये कोरोनाबाबत धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या दाव्यानुसार कोरोनाचा विषाणू हवेद्वारे पसरत आहे. याबाबतची दहा विविध कारणेही यात देण्यात आली आहेत.

कोरोना खरंच हवेतून पसरतो का?

कोरोना प्रसाराचे दोन मार्ग आहेत हे आपण पहिल्या दिवसापासूनच सांगतोय. एक प्रकार हा ड्राप्लेट इन्फेक्शन म्हणून जातो. तर दुसरा प्रकार हा एरोसॉल म्हणून जातो. एरोसॉल प्रकार हा साधारणत: हॉस्पिटलमध्ये होण्याची शक्यता असते. एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करताना किंवा त्याला एन्सथेशिया देताना रुग्णाच्या घशात आपण जी नळी घालतो तेव्हा एरोसालद्वारे लागण होण्याती शक्यता आहे. एखादा रुग्ण शेजारी असला तो शिंकला तर त्याच्या शिंकेच्या थेंबामधूनच संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. याबाबत हवेतून कोरोना संसर्ग होतो अशा ज्या स्टडी आहेत त्यावर फारसा विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही, असा दावा आयसीएमआरचे माजी संचालक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केला आहे. (Task Force Suggest to Wear Two Mask for covid-19)

संबंधित बातम्या : 

कोरोनाची लाट किती दिवस राहणार?, काय केले पाहिजे?; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात

कोरोनाचा प्रसार हवेतून वेगाने, मेडिकल जर्नल लॅन्सेटचा पुराव्यांसह दावा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.