एकही पैसा खर्च न करता दात चमकतील मोत्यासारखे, फक्त ‘हे’ उपाय करा

दात पिवळे पडले असतील तर ते पुन्हा चमकवण्यासाठी तुम्ही या घरगुती उपाय करून पहा. हे टिप्स तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतात.

एकही पैसा खर्च न करता दात चमकतील मोत्यासारखे, फक्त 'हे' उपाय करा
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 4:24 PM

Home Remedies For yellow Teeth: दात स्वच्छ आणि मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण ते चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यात देखील योगदान देतात.तुमचे हास्य हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे. पण दात पिवळसर होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. पण यामुळे अनेकदा लोकांना खूप लाजिरवाण्या गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. अनेकदा पिवळे दातही हास्याचा विषय ठरू शकतो. कारण आपल्यातील प्रत्येकाचं असं समज आहे की नीट ब्रश न केल्याने दात पिवळे पडू लागतात, पण यामागे अनेक कारणे असू शकतात ज्याने दात पिवळे पडतात.

जर रोज ब्रश करूनही तुमचे दात पिवळे पडत असतील तर ते सिगारेट ओढण्याची सवय किंवा चहा, कॉफी आणि सोड ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे असू शकते. तसे तर डेंटिस्टकडे जाऊन तुम्ही तुमचे पिवळे दात सहज साफ करून घेऊ शकता, पण जर तुम्ही नैसर्गिक उपाय शोधत असाल तर या गोष्टी करून पाहू शकता-

केळीची साल

फळांप्रमाणेच केळीची सालही खूप फायदेशीर मानली जाते. अशावेळी दातांची चमक कायम ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी फक्त केळीची साल घेऊन ती दातांवर चोळून घ्या. असे केल्याने दातांच्या कॅव्हिटीची समस्याही दूर होते.

कडुलिंब

कडुलिंबाचा वापर दातांच्या समस्यांसाठी खूप चांगला आहे. दात पिवळे पडणे आणि इतर दातांच्या समस्या दूर करण्यासाठी कडुनिंबाचा वापर रामबाण उपाय आहे.दातांवरील पिवळसरपणा दूर करण्यासाठी कडुलिंबाची टूथपेस्ट वापरा,यामुळे तुमचे दातही मजबूत होतील.कडुलिंब नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक आहे. कडुनिंबामध्ये दात पांढरे करण्याचे आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत.

मोहरीचे तेल आणि मीठ

दात चमकण्यासाठी मीठ आणि मोहरीचे तेल वापरा.यामुळे तुमच्या दातांचा पिवळेपणा दूर होऊ शकतो. यासाठी अर्धा चमचा मीठ घ्या. त्यात मोहरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि दातांवर मसाज करा. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होतो. हा उपाय तुम्ही आठवड्याभर करू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

दात पिवळे पडू नयेत म्हणून नियमित ब्रश करावे तसेच जेवणानंतर नेहमी चुळ भरावी अश्याने दातांना पिवळेपणा येणार नाही. तसेच रात्री झोपताना ब्रश करायला विसरू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.