Teeth care tips: स्वच्छ, निरोगी दात हवे आहेत का? मग या गोष्टींचे अजिबात करू नका सेवन
दंतचिकीत्सकांच्या (डेंटिस्ट) मते, सॉस खाल्ल्याने दातांना इजा होऊ शकते. विशेषतः टोमॅटो सॉस आणि सोया सॉस दातांसाठी जास्त हानिकारक असतात. यासाठी सोया आणि टोमॅटो सॉसचा वापर कमीत कमी करावा.
कोरोना विषाणूंच्या साथीमुळे लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. जरी लोक रोगप्रतिकारक शक्ती (immune system) मजबूत करण्यासाठी आणि कोरोना मार्गदर्शक तत्त्वांवर अधिक लक्ष देत असले तरी, दातांच्या स्वच्छतेबाबत लोकांच्या मनात चुकीचे समज आहे. केवळ रेाज सकाळी ब्रश केल्याने, दातांची योग्य काळजी (Proper dental care) घेतली जाते असे अनेक लोकांना वाटते. परंतु, तुम्ही चुक करत आहात. रोज ब्रश तर केलेच पाहिजे मात्र, त्या सोबतच नित्य आहारा बाबतही जागृकता हवी, चुकीच्या सवयी टाळणे आवश्यक आहे. दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी ब्रश करा. तसेच चहा-कॉफी प्यायल्यानंतर पाणी अजिबात पिऊ नका. त्याच वेळी, दूध पिल्यानंतर, पाण्याने चुळभरुन स्वच्छ धुवा. तुमचा आहारही सुधारा. कळत-नकळत अशा अनेक गोष्टी आपण सेवन करतो, ज्या दातासाठी योग्य नसतात. तुम्हालाही तुमचे दात स्वच्छ आणि निरोगी (Teeth clean and healthy) ठेवायचे असतील तर या गोष्टींचे सेवन करू नका.
सॉस
दंतचिकीत्सकांच्या (डेंटिस्ट) मते, सॉस खाल्ल्याने दातांना इजा होऊ शकते. विशेषतः टोमॅटो सॉस आणि सोया सॉस दातासाठी जास्त हानिकारक असतात. यासाठी सोया आणि टोमॅटो सॉसचा वापर कमीत कमी करावा. खाल्यानंतर दात साफ करण्यासाठी अगोदर तोंडात पाण्याने चुळ भरून गुळण्या करणे चांगले. बोट फिरवूनही दात स्वच्छ करता येतील. रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे सुनिश्चित करा.
थंड पेय
बऱ्याचदा लोक ताजेतवाने होण्यासाठी थंड पेये म्हणजेच एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतात. हे दातांसाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे कोल्ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्सचा वापर कमी करा. त्याऐवजी तुम्ही नैसर्गिक पेये घेऊ शकता.
कँडी
मिठाई खाल्ल्याने दात किडतात. अनेकदा लहान मुलांचे दात जास्त कँडी-चॉकलेट खाल्ल्याने किडतात. यासोबतच दातांमध्ये संवेदनशीलताही येऊ लागते. यासाठी मिठाई खाण्यावर नियंत्रण ठेवा. तसेच चहा कमी प्या.
लिंबूवर्गीय फळे
संत्री, द्राक्षे इत्यादीसारख्या लिंबूवर्गीय फळांचा रस नक्कीच छान लागतो, परंतु त्यांच्या आम्लयुक्त सामग्रीमुळे मुलामा चढवणे खराब होऊ शकते, ज्यामुळे दात किडतात. त्यामुळे लिंबूवर्गीय फळांचे सेवन कमी करा.
अल्कोहोल: तुमचे तोंड कोरडे करणारे कोणतेही पेय. ते तुमच्या दातांसाठी वाईट आहे. तर, अशा पेयांपैकी एक म्हणजे अल्कोहोल, कारण अल्कोहोलच्या सेवनाने दात किडण्याचा आणि रोगाचा धोका असतो.
कार्बोनेटेड पेये: या प्रकारची पेये तुमचे आरोग्य आणि दात दोघांसाठीही हानिकारक असतात कारण या पेयांमुळे दातांवर डाग पडतात आणि जास्त प्रमाणात आम्ल तयार होते ज्यामुळे दातांमध्ये जंत होऊ शकतात.
दात मजबूत ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो
1) दर 24 तासांनी दोनदा दोन-तीन मिनिटे दात घासावेत. २) फ्लॉस करा आणि फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट वापरा. 3) बाटलीचा वरचा भाग उघडण्यासाठी किंवा काजू फोडण्यासाठी दातांचा अतिवापर करू नका. ४) अँटी-बॅक्टेरियल माउथवॉशचा नियमित वापर करा. ५) जर तुम्हाला दातांच्या समस्या असतील तर चांगल्या दंतवैद्याशी संपर्क साधा.