एका पायावर दहा सेंकद स्वतःचा भार सांभाळू न शकरणारे जाताय मृत्यूच्या दिशेने ? जाणून घ्या, मृत्युचा धोका सांगणारी चाचणी
एका संशोधनात असे समोर आले आहे की, जे लोक एका पायावर 10 सेकंद उभे राहून शरीराचा समतोल राखू शकत नाहीत, त्यांच्या मृत्यूचा धोका 10 वर्षांत दुप्पट वाढतो. जाणून घ्या, काय आहे संशोधन आणि मृत्यूची चाचणी कशी करावी.
व्यायाम किंवा योगा करताना अनेकांना संतुलन राखता येत नाही. तुमच्या बाबतीतही असेच घडते का? जर होय, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तुम्हालाही एका पायावर उभे राहण्यात (Standing on one foot) अडचण येत असेल, तर हे एखादया गंभीर समस्येचे लक्षण असू शकते की तुम्ही याचा विचारही केला नसेल. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये नुकतेच प्रकाशित संशोधनानुसार, मध्यमवयीन आणि वृद्ध लोक जे एका पायावर 10 सेकंद संतुलन राखू शकत नाहीत, त्यांच्या मृत्यूचा धोका (Risk of death) 10 वर्षांत जवळजवळ दुप्पट होतो. तुम्ही तुमच्या शरीराचा किती समतोल राखू शकता यावरून तुमच्या आरोग्याचा अंदाज लावता येतो. याआधी, दुसऱ्या एका संशोधनात असे समोर आले होते की, जे लोक एका पायावर उभे राहून शरीराचा समतोल राखू शकत नाहीत, त्यांना पक्षाघाताचा धोका जास्त (The risk of paralysis is high) असतो.
12 वर्षे सलग अभ्यास करून मांडले संशोधन
ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिनलंड आणि ब्राझील अशा विवीध देशातील तज्ज्ञांनी १२ वर्षे सलग अभ्यास करुन संशोधन मांडले त्यानुसार असे आढळून आले की, एका पायावर १० सेकंद उभे राहून आपल्या शरीराचे वजन सांभाळू न शकणाऱ्या प्रौंढामध्ये मृत्यूचा धोका दुपटीने वाढतो. संशोधनाच्या या चाचणीत जे अनुत्तीर्ण झाले, त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याचे दिसून आले. चाचणीत यशस्वी झालेल्या लोकांपेक्षा 10 सेकंद एका पायावर उभे राहू न शकणाऱ्या लोकांमध्ये टाइप-2 मधुमेहाची समस्या अधिक आढळून आली. अशा लोकांमध्ये लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकाराच्या तक्रारीही अधिक दिसून आल्या.
नियमीत तपासणीत करावा समावेश
या संशोधनाचे प्रमुख संशोधक डॉ. क्लॉडिओ गिल अराजुओ म्हणाले, “मला वाटते की शरीर संतुलनाचा थेट संबंध वाईट पद्धतीची जिवनशैली आहे.” म्हणजे असे लोक शारीरिक हालचाली किंवा व्यायाम करत नाहीत. किंवा जे वृद्ध आणि प्रौढ पडून दुखापत होतात, त्यांची हाडे मोडतात. त्याच्यावर उपचार होऊन देखील जिवनशैलीत कुठलाच बदल करत नाहीत अशा, लोकांचे आयुर्मान कमी-कमी हेात जाते. आणि हे सर्व केवळ वाईट पद्धतीच्या जिवनशैलीचा परिपाक आहे. ते पुढे म्हणाले, माझ्या मते, ५१-७५ वयोगटातील वृद्धांच्या नियमित आरोग्य तपासणीमध्ये ‘सेल्फ बॅलेन्स टेस्ट’ या चाचणीचाही समावेश केला पाहिजे.
संशोधन काय सांगते
51 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 1702 लोकांचा या संशोधनात समावेश होता. हे संशोधन 2008 ते 2020 पर्यंत चालले. सुरुवातीला, सर्व सहभागींना कोणत्याही आधाराशिवाय एका पायावर 10 सेकंद उभे राहण्यास सांगण्यात आले. यादरम्यान, सहभागींना एक पाय दुसऱ्याच्या मागे ठेवण्यास आणि दोन्ही हात बाजूला ठेवण्यास सांगण्यात आले. त्यांना एका पायावर उभे राहण्यासाठी केवळ तीन संधी देण्यात आल्या होत्या. संशोधनादरम्यान, या चाचणीत 5 पैकी एकच अनुत्तीर्ण झाले. चाचणीनंतर, पुढील 10 वर्षांत 123 लोकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांमध्ये ही चाचणी उत्तीर्ण होऊ न शकणाऱ्यांची संख्या जास्त होती.
संशोधकांनी नमूद केले की, अभ्यासाला काही मर्यादा होत्या, त्यात सर्व सहभागी ब्राझिलियन होते, याचा अर्थ अभ्यासाचे परिणाम इतर वंश आणि देशांना पूर्णपणे लागू होतीलच असे नाही. परंतु, आपणही एकदा का होईना…घरच्या घरी एका पायावर उभे राहता येतयं का? तपासून घ्या आणि आपल्या जिवनशैलीत आळस झटकून व्यायामाचा सहभाग करा. असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. याबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारीत केले आहे.