मुंबई | 17 डिसेंबर 2023 : अंजिर थंडीत खाल्ल्याने शरीरात उब तयार होते. हिवाळ्यात अंजीर जर रात्री दूधात भिजवून खाल्ले तर आरोग्याला अत्यंत लाभदायक असते. अंजीरात एंटीऑक्सीडेंट्स, फायबर, झिंक, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे जर हिवाळ्यात तुम्ही नियमित अंजीर खात असाल तर तुमचे आरोग्य चांगले रहाते. तुम्ही फिट आणि हेल्दी राहाल. अंजिराचा आहारात समावेश केल्याने तुम्हाला नवचैतन्य वाटू लागेल. तर पाहूयात अंजीरात काय फायदे आहेत.
अंजिरात पोटॅशियम खनिज असल्याने त्याचे नियमित सेवन ब्लड प्रेशर नियमन करण्यास फायदेमंद ठरते. तसेच ते सोडीयमच्या हानिकारक प्रभावाला कमी करते.
अंजीरात झिंक, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे खनिज आढळतात. ही सर्व तत्वे तुमच्या लैंगिक आरोग्य राखण्यास मदत करते.
अंजीरात मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट आढळते. यामुळे तुमच्या ब्लडप्रेशरला नियंत्रित करण्यास मदत मिळते. तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यास देखील त्यामुळे मदत मिळते.
अंजीरात मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम आढळते. हे पोटॅशियम क्लोरोजेनिक एसिड आणि ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करत असते.
अंजिराचा आहारात वापर केल्याने तुमच्या शरीरातील ट्रायग्लिसराईड्सचा स्तर कमी होतो. हा स्तर तुमच्या हृदयाच्या समस्यांचे मुख्य कारण आहे.
अंजिरात झिंक, मॅगनिज, मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे खनिज आढळतात. ही सर्व तत्वे पिरीयड्स दरम्यान महिलांना होणाऱ्या समस्यामध्ये खूपच लाभदायक आहे.
अंजिरात एंटीऑक्सीडेंट्स आणि फायबर आढळतात. त्यामुळे हार्मोन असंतुलन आणि पीरीडीयड्स मध्ये महिलांना होणारा त्रास कमी होतो. हाडांसाठी देखील अंजीर चांगले आहे.
अंजिरात कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम सारखे पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे तुमचे मेटाबॉलिजम ठीक रहाते आणि वजन कमी होण्यास देखील मदत मिळते.
( ही सर्व माहीती सामान्यज्ञानावर आधारित आहे. योग्य आहार नियोजनासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करावा )