Cm Uddhav Thackeray Corona Vaccination | सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावरील मास्क : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते राज्यातील कोरोना लसीकरणाला मुंबईतील बीकेसीत प्रारंभ करण्यात आला. यावेळेस मुख्यमंत्री बोलत होते.

Cm Uddhav Thackeray Corona Vaccination | सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावरील मास्क : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 12:43 PM

मुंबई : “लस आलीये म्हणजे आता काहीही होऊ शकतं, असा भ्रम काही जणांचा होऊ शकतो, पण असं नाहीये. लसीकरणाला आता सुरुवात होतेय. सर्वसामांन्यांना लस मिळेपर्यंत ठराविक वेळ लागणार आहे. ही लस किती प्रभावशाली आहे, ती किती परिणामकारक आहे, याबबात लस घेतल्यानंतरच माहिती होईल. लस आली आहे. मात्र सर्वात उत्तम लस म्हणजे आपल्या तोंड्यावर असलेला मास्क आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बीकेसीत (BKC) लसीकरणाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळेस ते बोलत होते. या कार्यक्रमाला शहराच्या प्रथम नागरिक महापौर किशोरी पेडणेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. (The best vaccine is a face mask said chief minister uddhav thackeray at vaccination program in mumbai)

लस आली म्हणजे मास्क घालणं सोडायचं नाहीये. लस घेतल्यानंतरही तुम्हाला मास्क घालणं बंधनकारक असणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. “कोरोनाचा शेवट करायचा आहे. जोपर्यंत कोरोना संपत नाही, तो पर्यंत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनाचं पालन करा”, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

कोरोना वॉरियर्सना मानाचा मुजरा

“जीवाची पर्वा न करता कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या कोरोना वॉरियर्सना मी मानाचा मुजरा करतो. कोरोना काळातील ते दिवस आठवल्यावर आताही शहारा येतो. हाताशी काहीच नसताना आपण पुढे काय करायचं, ही चिंता दिवस रात्र होती. या संकटाच्या काळात आपण सर्व आमच्या सोबत नसता तर आज हे कोव्हिड सेंटर अशा प्रकारे पाहायला मिळालं नसतं”, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

दरम्यान मुंबईत एकूण 9 केंद्रांवरील 40 बूथ सेंटरवर लसीकरण करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या : 

Corona Vaccination live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते राज्यातील कोरोना लसीकरणाला प्रारंभ

आजारी पडलेले कोरोना योद्धे रुग्णालयातून परतलेच नाहीत; मोदींना अश्रू अनावर

(The best vaccine is a face mask said cm uddhav thackeray at vaccination program in mumbai)

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.