Health | तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे इन्सुलिनवरील अवलंबित्व कमी होण्यास होणार मदत!  

| Updated on: Jun 07, 2022 | 12:46 PM

आहार, व्यायामाची पद्धत, झोप यांसारख्या जीवनशैलीशी निगडित गोष्टी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधे यांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होत असतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या उपचारांची सुरुवात ही बहुतेकदा एका गोळीपासून होते. कालांतराने HbA1c ची नेमकी पातळी जपण्यासाठी तोंडावाटे घ्यावयाच्या डायबेटिक अँटिबायोटिक औषधांची (ओएडी) संख्या वाढू शकते.

Health | तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे इन्सुलिनवरील अवलंबित्व कमी होण्यास होणार मदत!  
Image Credit source: istockphoto.com
Follow us on

मुंबई : मधुमेह (Diabetes) ही एक सर्रास आढळून येणारी आरोग्यविषयक समस्या आहे, जिच्यावर नियमितपणे देखरेख ठेवणे आवश्यक असते. देखरेखीमध्ये खंड पडल्यास उपचारांना विलंब होऊ शकतो आणि त्यातून मधुमेहाशी निगडित इतर गुंतागुंती उद्भवू शकतात. आज मधुमेही व्यक्तींच्या रक्तातील ग्लुकोजची (Glucose) पातळी सातत्याने हरक्षणी तपासणा-या नव्या उपचारपद्धती आणि क्रांतीकारी वेअरेबल तंत्रज्ञाने उपलब्ध झाली आहेत. American Diabetes Association च्या मते ग्लुकोजच्या पातळीवर सातत्याने देखरेख ठेवणे हे इंटेन्सिव्ह इन्सुलीन उपचार घेणा-या व्यक्तींव्यतिरिक्त इतरांसाठीही उपयुक्त ठरू शकते. याचा अर्थ या तंत्रज्ञानाचा (Technology) वापर कितीही कमी अथवा जास्त तीव्रतेच्या मधुमेहासह जगणा-या सर्व व्यक्तींसाठी व्यापक स्तरावर करता येऊ शकतो. ADA च्या म्हणण्याप्रमाणे टाइप 1 आणि टाइप 2 प्रकारातील मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किमान 70 टक्‍के इतक्या टाइम इन रेंजचे लक्ष्य समोर ठेवले पाहिजे.

व्यवस्थापनाकडे सहजगत्या वळताना

आहार, व्यायामाची पद्धत, झोप यांसारख्या जीवनशैलीशी निगडित गोष्टी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औषधे यांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होत असतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या उपचारांची सुरुवात ही बहुतेकदा एका गोळीपासून होते. कालांतराने HbA1c ची नेमकी पातळी जपण्यासाठी तोंडावाटे घ्यावयाच्या डायबेटिक अँटिबायोटिक औषधांची (ओएडी) संख्या वाढू शकते. काही रुग्णांच्या बाबतीत औषधे घेऊनही ग्लुकोजची पातळी वाढलेलीच राहत असल्याने ओएडीवरून इन्सुलिन इंजेक्शन्सकडे वळणे आवश्यक ठरू शकते.

उपचार लवकर सुरू करणे आवश्यक

इन्सुलिन घेण्याविषयी रुग्णांच्या मनात आशंका असू शकते आणि हे उपचार सुरू करणे शक्य तितके पुढे ढकलण्याकडे त्यांचा कल असतो, मात्र रक्तातील ग्लुकोजची पातळी, विशेषत: जेवणानंतरची ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राखण्यासाठी इन्सुलिन उपचारांचा समावेश केला जातो. इतकेच नव्हे तर पॉलिपील उपचारपद्धती वापरून म्हणजे काही औषधांची एकत्रितपणे मात्रा निश्चित करूनही काही वेळा रुग्णांना आपली अपेक्षित उद्दीष्ट्ये साध्य करता येत नाहीत, म्हणजे ग्लुकोजचे इष्टतम संयोजन शक्य होत नाही.

हे सुद्धा वाचा

डॉ. उन्नीकृष्णन एजी म्हणाले की…

पुण्यातील चेल्लाराम हॉस्पिटल डायबेटिस केअर अँड मल्टिस्पेश्यालिटीचे एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि सीईओ डॉ. उन्नीकृष्णन एजी म्हणाले, “मधुमेही आणि इन्सुलिन उपचार घेणा-या किंवा विशिष्ट अँटि-डायबेटिस औषधे तोंडावाटे घेणा-या रुग्णांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी खूप खाली घसरण्याचा किंवा खूप जास्त वाढण्याचा धोका असतो. ग्लुकोजची पातळी खूप वाढल्यास सर्वसाधारणपणे काही लक्षणे दिसत नाहीत, मात्र त्यामुळे शरीराची सातत्याने हानी होत राहते, म्हणूनच मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये सातत्याने देखरेख हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो.