WHO: एका सिगारेटमुळे वातावरणात 7000 हून अधिक रसायनं; एकामुळे 70 जणांचा जीव धोक्यात; कॅन्सरचे प्रमाण वाढले
सिगारेटच्या धुरात 7,000 प्रकारची रसायने आढळतात. या रसायनांमुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, कर्करोगासह अनेक मोठे आजार मानवाल होतात. सिगारेटचा सर्वात मोठा परिणाम फुफ्फुसांवर होतो, म्हणून फुफ्फुसाच्या कर्करोगाने 10 पैकी 9 मृत्यूचे कारण धूम्रपान असल्याचे सांगितले आहे.
मुंबईः जगात दिवसेंदिवस मानवी आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण होत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने (world health organization) सिगारेटबाबत नुकताच एक धक्कादायक माहिती जाहीर केली आहे. जगात कोट्यवधी लोकं सिगारेट ओढत आहेत, मात्र त्याचा विपरित परिणाम ज्याप्रमाणे सिगारेटचे व्यसन करणाऱ्या होतो त्याचप्रमाणे सिगारेटचा धूर (Cigarette smoke) बाहेर सोडल्यामुळेही होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच दिलेल्या धक्कादायक माहितीमध्ये सांगण्यात आले आहे की, एका सिगारेटच्या (Cigarette) वापरामुळे वातावरणात 7000 हून अधिक रसायने सोडली जात आहेत, आणि त्याचा परिणाम म्हणून किमान 70 माणसे आणि प्राण्यांना होत असून सिगारेटमुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले आहे.
There are over 7⃣0⃣0⃣0⃣ chemicals ? released into the environment with use of a single cigarette and at least 7⃣0⃣ are known to cause #cancer in humans and animals. #NoTobacco ? pic.twitter.com/ieV9fb8Bq2
— World Health Organization (WHO) (@WHO) August 22, 2022
जगात कोट्यवधी सिगारेटचे व्यसन करणारे आहेत, त्यामुळे सिगारेट ओढून झाल्यानंतर जगभरात दरवर्षी 4.5 ट्रिलियन सिगारेट फेकल्या जात असल्याची माहितीही जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली आहे.
अर्धवट सिगारेट फेकल्याचाही धोका
सिगारेट ओढून अर्धवट फेकलेल्या सिगारेटमुळेही त्याचा मोठ्या प्रमाणात कचरा होत आहे. त्याचाही विपरित परिणाम नागरिकांवर होत असून यामुळे आरोग्यावर त्यचा घातक परिणाम होत आहे. ज्याप्रमाणे मानवी आरोग्याव सिगारेटचा परिणाम होत आहे, त्याच प्रमाणे इतर प्राण्यांनाही त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.
सिगारेट धुरामुळे 7000 रासायनिक द्रव्य
सिगारेट ओढल्यामुळे ज्याप्रमाणे मानवी आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत आहे, त्याचप्रमाणे सिगारेटचा घातक परिणाम वातावरणावर होत आहे. ज्याप्रमाणे सिगारेटच्या धुरामुळे वातावरणात 7000 रासायनिक द्रव्य सोडली जातात, त्याचा परिणाम थेट परिणाम जसा मानवाच्या शरीरावर होत आहे,त्याच प्रमाणे सिगारेटचा वाईट परिणाम वातावरणावरही होत आहे.
सिगारेटचे विघटन होण्यास 10 वर्षे
सिगारेट ओढून झाल्यानंतर अर्धवट टाकलेल्या सिगारेटचे विघटन होण्यासाठी 10 वर्षे लागतात, ज्यामुळे आपल्या इको-सिस्टममध्ये आणखी रसायने मिसळून सृष्टीचे नुकसान होत असल्याचेही डब्लूएचओने म्हटले आहे.
सर्वात जास्त परिणाम फुफ्फसांवर
सिगारेटच्या धुरात 7,000 प्रकारची रसायने आढळतात. या रसायनांमुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, कर्करोगासह अनेक मोठे आजार मानवाल होतात. सिगारेटचा सर्वात मोठा परिणाम फुफ्फुसांवर होतो, म्हणून फुफ्फुसाच्या कर्करोगाने 10 पैकी 9 मृत्यूचे कारण धूम्रपान असल्याचे सांगितले आहे.