मुलांना ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ ठेवण्यासाठी सूर्यनमस्काराला पर्याय नाही, जाणून घ्या फायदे 

योगात सूर्यनमस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. मुलांनी नियमितपणे सूर्यनमस्कार केल्यास यातून उत्तम पध्दतीने मेंदूचा विकास होण्यास मदत होते. शिवाय मुलांमधील एकाग्रता वाढीस लागून विविध शारीरिक फायदेही मिळू शकतात.

मुलांना ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ ठेवण्यासाठी सूर्यनमस्काराला पर्याय नाही, जाणून घ्या फायदे 
सुर्य नमस्कार
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 12:46 PM

योगसाधनेत फार पूर्वीपासून सूर्यनमस्काराला (Surya Namaskar) अत्यंत महत्व देण्यात आले आहे. असे म्हणतात, की सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायामाचा प्रकार आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांचा चांगला व्यायाम होतो. शरीर पिळदार होते. यासह सूर्यनमस्कारामुळे आपल्या मेंदूचा विकास (Brain development) होउन मानसिक आरोग्य उत्तम राहत असते. अबालवृध्दांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक सूर्यनमस्कार करु शकतात. शारीरिक काही समस्या असणाऱ्यांनी मात्र हा व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक असते. दरम्यान, मुलांनी लहानपणापासून सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात केल्यास याचा त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो. मुलांच्या मेंदूचा विकास होउन त्यांची एकाग्रता (Concentration) वाढीस लागत असते. या लेखातून सूर्यनसस्काराचे फायदे जाणून घेणार आहोत.

रक्तप्रवाह चांगला राहतो

अनेकदा मुलांमध्ये रक्तप्रवाह पाहिजे तसा सुरळीत नसल्याने मुल त्यांच्या वयाच्या तुलनेत चपळ नसतात. त्यांचा मानसिक विकास योग्य पध्दतीने होत नाही. गेल्या अडीच वर्षाच्या काळात मुलं घरातच असल्याने त्यांचे शारीरिक क्रियाकलाप कमी झाले होते. त्यामुळे अनेक मुलांच्या आरोग्यावर याचा नकारात्मक परिणाम दिसून आला. सूर्यनमस्कार केल्याने मुलांमधील रक्तप्रवाह चांगला राहतो. त्यामुळे मुलांमध्ये उत्साह टिकून राहत असतो. तज्ज्ञांच्या मते सूर्यनमस्कार केल्याने फुफ्फुसांमध्ये योग्य प्रमाणात हवा पोहचते. त्यामुळे ऑक्सीजन देखील पुरेसा मिळतो.

त्वचा आणि केसांना फायदा

सूर्यनमस्कार केल्याने मुलांच्या ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते. ब्लड सर्कुलेशन चांगले राहिल्यामुळे याचा फायदा शरीराच्या विविध अवयवांना होत असतो. त्याच बरोबर यातून मुलांच्या त्वचेचे व केसांचे आरोग्यदेखील सुधारत असते. तज्ज्ञांच्या मते, ब्लड सर्कुलेशन चांगले असेल तर, मुलांच्या त्वचेला चमक प्राप्त होते. त्याच प्रमाणे केस दाट व मजबूत होत असतात. त्यामुळे मुलांना सूर्य नमस्कार करण्याची सवय लावली पाहिजे.

तणावापासून मुक्ती मिळते

मुलांवर शाळा, शिकवणी, अभ्यास, विविध टास्क आदींचा मोठ्या प्रमाणात तणाव असतो. यातून मुलं चिडचिडे स्वभावाचे होतात. ही समस्या जास्त असल्यास मुलांमध्ये एकाकीपणा निर्माण होतो. ते कुणाशी मनमोकळे बोलत नाही. आपल्याच विचारात असतात. सूर्यनमस्कार केल्याने या समस्येपासून सुटका होते. सूर्यनमस्कार केल्याने मुलांच्या मनावरील ताण कमी होतो. त्यांना अभ्यासात उत्साह वाटत असतो. त्यामुळे मुलांमध्ये सूर्यनमस्काराची गोडी निर्माण करावी.

संबंधित बातम्या

तोंडाच्या समस्यांकडे दुर्लक्ष कराल तर वाढेल ‘या’ आजारांचा धोका…

तुम्हाला जर ‘या’ समस्या असतील तर, टोमॅटोपासून नेहमी अंतर ठेवून रहा

‘खोबरेल तेल’ आणि ‘कापूर’ यांच्या वापरातून करा, उन्हापासून केसांचे संरक्षण.. जाणून घ्या महत्वाच्या टिप्स !

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.