तुमच्याही शरीरात असू शकते प्रोटीनची कमतरता, ‘अशी’ ओळखा 5 लक्षणे

प्रोटीन आपल्या शरीरासाठी एक महत्वाचं पोषक तत्व आहे. जे शरीरातील पेशींची निर्मिती तसेच स्नायूना मजबुती देणे आणि शरीराच्या विविध कार्यांच्या संचालनात महत्त्वाची भूमिका बजावते.

तुमच्याही शरीरात असू शकते प्रोटीनची कमतरता, 'अशी' ओळखा 5 लक्षणे
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 7:45 AM

Protein Deficiency Symptoms : प्रोटीन आपल्या शरीरासाठी एक महत्वाचं पोषक तत्व आहे. जे शरीरातील पेशींची निर्मिती तसेच स्नायूना मजबूती देणे आणि शरीराच्या विविध कार्यांच्या संचालनात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र आजच्या धकाधकीच्या आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे अनेक जण प्रथिनांच्या कमतरतेला बळी पडत आहेत. प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. ही समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकते. आपल्या शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास हे परिणाम दिसून येतात.

स्नायू कमकुवत होणे : प्रथिनांचे मुख्य कार्य स्नायू तयार करणे आणि त्यांना मजबुती देण्याचे देखील काम करते. जेव्हा शरीरात प्रथिनांची कमतरता असते तेव्हा स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि शरीराला थकवा जाणवतो. कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय देखील तुम्हाला स्नायूचे दुखणे किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर हे प्रथिनांच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.

केस गळणे : तुमच्या शरीरात प्रथिनांच्या कमतरतेचे एक सामान्य लक्षण म्हणजे केस गळणे. तुम्ही नियमित प्रथिने समृद्ध आहार घेतल्यास केसांचे आरोग्य सुधारतो, कारण केसांमध्ये सुमारे ९०% टक्के प्रथिने असतात. जेव्हा शरीरात प्रथिनांची कमतरता असते तेव्हा केस गळणे आणि ते कमकुवत होण्यास सुरुवात होते.

त्वचेच्या समस्या : तुमच्या आहारामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश नसल्यास त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. अशातच प्रथिनांच्या कमतरतेमुळे त्वचेवर देखील परिणाम होऊ शकतो. जेव्हा शरीरात पुरेसे प्रथिने नसतात तेव्हा त्वचा सावली पडू शकते. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, किंवा सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्वचेच्या कोलेजन निर्मितीसाठी प्रथिने आवश्यक आहेत आणि त्याशिवाय त्वचेची लवचिकता आणि तजेलदारपणा कमी होऊ शकतो.

वारंवार होणारा आजार : प्रथिने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. जेव्हा शरीरात प्रथिनांची कमतरता असते तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे आपण लवकर आजारी पडू शकता. सर्दी, ताप आणि इतर संक्रमणांना बळी पडण्याची शक्यता वाढते, कारण रोगांशी लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडीज आणि इतर प्रथिने शरीरात तयार होऊ शकत नाहीत.

तीव्र थकवा आणि अशक्तपणा : प्रथिनांच्या कमतरतेमुळे शरीरात ऊर्जेची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो. जर आपल्याला नियमितपणे थकवा जाणवत असेल, त्यात तुम्ही पुरेशी विश्रांती घेतली असली तरी हे आपल्या शरीरास योग्य प्रमाणात प्रथिने मिळत नसल्याचे लक्षण असू शकते.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.