‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे सुरू होऊ शकतो डोकेदुखीचा त्रास, आजपासूनच कमी करा सेवन अन्यथा….

थंडीच्या दिवसांत अनेक लोकांना डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. काही पदार्थांच्या सेवनानेही तुमची डोकेदुखी वाढू शकते. कोणते पदार्थ सतत खाल्ल्याने डोकेदुखी होऊ शकते, ते जाणून घ्या.

'या' पदार्थांच्या सेवनामुळे सुरू होऊ शकतो डोकेदुखीचा त्रास, आजपासूनच कमी करा सेवन अन्यथा....
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 10:36 AM

नवी दिल्ली – थंडीच्या दिवसांत अनेक लोकांना डोकेदुखीचा (headache in winter) त्रास होऊ लागतो तर काही लोकांचं डोकं स्ट्रेसमुळेही (stress) दुखू शकतं. अनेकदा लोकांना तीव्र डोकेदुखीमुळे वेदना होतात. पण तुम्ही रोज खात असलेल्या काही पदार्थांमुळे डोकेदुखी होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे का ? होय, आपल्या खाण्यापिण्याच्या काही सवयींमुळेही डोकेदुखी वाढू शकते. असे काही विशिष्ट पदार्थ आहेत, ज्यांचे नियमित सेवन केल्याने डोकेदुखी (food can trigger headache) होऊ शकते. कोणते पदार्थ सतत खाल्ल्याने डोकेदुखी होऊ शकते, ते जाणून घ्या.

डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरणारे पदार्थ

– तुम्ही दररोज चीजचे सेवन केले तर त्यामुळेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. चीजमध्ये टायरामाइन नावाचा घटक असतो. हा एक असा पदार्थ आहे जो रक्तवाहिन्या संकुचित करतो. त्यामुळेही काहींना डोकेदुखीचा त्रास होतो. डोकं दुखत असेल तर चुकूनही कोणत्याही पदार्थात चीज टाकू नका.

हे सुद्धा वाचा

– रेड वाईन प्यायल्यामुळेही डोकेदुखी वाढू शकते हे तुम्हाला माहीत आहे का ? तुम्ही दिवसभरात कितीही मद्यपान केले तरी सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी सुरू होते. प्रत्येकाने मर्यादित प्रमाणात दारू प्यावी. अल्कोहोलच्या अतिसेवनाने यकृतही खराब होऊ शकते.

– काही लोकांना चॉकलेट खायची खूप आवड असते. ते एका दिवसात 2-3चॉकलेट्स खाऊ शकतात, तुम्हीही असं करत असाल तर आजच ही सवय बंद करा. चॉकलेटमुळे केवळ तीव्र डोकेदुखीच होत नाही तर शुगर लेव्हलसुद्धा वाढू शकते. चॉकलेटमध्ये टायरामाइन नावाचा घटक आहे, जो एक संयुग आहे. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.

– कृत्रिम गोड पदार्थ किंवा आर्टिफिशिअल स्वीटनर्सचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. कारण त्यामध्ये एस्पार्टेम नावाचा घटक असतो, ज्यामुळे डोपामाइनची पातळी कमी होते. डोपामाइनच्या कमी पातळीमुळे, काही लोकांमध्ये डोकेदुखीची शक्यता वाढते.

– आबंट फळांमध्ये ऑक्टोमाइन नावाचे संयुग अथवा कंपाऊंड असते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. ज्या लोकांना आम्लयुक्त फळे सहज पचत नाहीत, त्यांना लिंबू, द्राक्षे आणि संत्र्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखीच्या वेळी या आंबट फळांचे सेवन टाळणे उत्तम ठरते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.