‘या’ 5 प्रकारच्या पदार्थांच्या सेवनाने वाढतो मूळव्याधाचा त्रास! येऊ शकते रक्त…
मूळव्याध झाल्यास प्रचंड त्रास होतो. काही पदार्थांच्या सेवनाने तर हा त्रास आणखीनच वाढतो, तो इतका की काही वेळा रक्तस्त्रावही होऊ शकतो.
नवी दिल्ली – तुमची बिघडलेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे तुम्हाला अनेक आजारांचा (many diseases) सामना करावा लागू शकतो. एवढेच नव्हे तर अयोग्य खाण्या-पिण्यामुळे तुमचे पचनही बिघडू शकते, ज्यामुळे पोटासंबंधीही समस्या निर्माण होऊ शकतात. गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठता आणि इतर समस्यांचा त्यात समावेश असतो. गॅस आणि बद्धकोष्ठता दीर्घकाळापर्यंत अनेक गंभीर समस्यांचे कारण बनू शकतात, ज्यात मूळव्याधाचा (Piles) देखील समावेश आहे. म्हणूनच रोजच्या आहारातून असे पदार्थ वगळणे (foods to avoid in piles)महत्त्वाचे आहे, जे या समस्येचे सर्वात मोठे कारण आहेत. असे कोणते पदार्थ आहेत ते जाणून घ्या.
1) फास्ट फूड
सध्या, फास्ट फूड हा सर्वाधिक विकला जाणारा आणि खाल्ला जाणारा पदार्थ आहे. फास्ट फूडमध्ये भरपूर मसाले आणि अस्वास्थ्यकर पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे आतड्यांचे खूप नुकसान होते आणि हे पदार्थ आपली पचनसंस्था अन्न नीट पचवू शकत नाही. फास्ट फूड हे मूळव्याध होण्याचे सर्वात मोठे कारण आहे.
2) फ्रोजन फूड
ज्याप्रमाणे फास्ट फूड आपल्या पचनास हानी पोहोचवते, त्याचप्रमाणे गोठवलेल्या अन्नामुळे देखील मूळव्याधाचा धोका वाढू शकतो. खरंतर गोठवलेल्या पदार्थांचे सेवन हे पचनासाठी अतिशय हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामध्ये फायबरसारख्या पोषक तत्वांचीही कमतरता असते, ज्यामुळे मूळव्याधची समस्या उद्भवते आणि वाढू लागते. ही समस्या गंभीर झाल्यास रक्तस्त्रावही होऊ शकतो.
3) तेल आणि मसाले
जर तुम्हाला जास्त मसालेदार किंवा तिखट पदार्थ खायला आवडत असतील तर त्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. जास्त तेल आणि मसाल्यांनी बनवलेल्या अन्नामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते. आणि त्यामुळे मूळव्याध होऊ शकतो. हे मसालेदार पदार्थ तुमच्या स्टूलमध्ये रक्ताची समस्या देखील वाढवतात.
4) चीज खाणे
तुम्हाला प्रत्येक पदार्थामध्ये चीज घालून खायची सवय असेल तर ही सवय लगेच बदलावी. चीजचे अधिक सेवन केल्याने बद्धकोष्ठता वाढू शकते. एवढेच नव्हे तर प्रमाणापेक्षा अधिक चीज खाल्यास मूळव्याध होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे चीजचा अतिवापर टाळा.
5) पॅकबंद पदार्थ
बरेच लोक भूक लागल्यावर पॅकबंद पदार्थ खातात, ज्यात चिप्स आणि स्नॅक्सचा समावेश असतो. या सर्व गोष्टी तुमच्या पचनसंस्थेला हानी पोहोचवण्याचे काम करतात. या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ते पचणे खूप कठीण असते. यासोबतच त्यामध्ये तेलाचे प्रमाणही जास्त असते, जे मूळव्याध होण्याचा धोका वाढवण्याचे काम करते.