Fruits For Diabetes: मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात ही फळं, अचानक वाढत नाही ब्लड शुगर
काही अशी फळं आहेत जे मधु्मेहाचे रुग्णही खाऊ शकतात. ती खाल्याने शुगर अचानक वाढण्याचा धोका नसतो.
नवी दिल्ली – मधुमेहाच्या रूग्णांनी (diabetes) काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्याआधी, त्या पदार्थाने त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (sugar level) वाढणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागते. विशेषतः जेव्हा फळं खायची वेळ तेव्हा अधिक विचार केला जातो, कारण फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. मात्र फळांमध्ये नैसर्गिक साखर (natural sugar in fruits) आवश्यकतेपेक्षा जास्त असल्यास रक्तातील साखर वाढू शकते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांनी मध्ये कोणती फळे खावीत, हे जाणून घेऊया.
बेरीज
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी यांसारख्या बेरीज मधुमेहामध्ये खाऊ शकतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात आणि ते शरीरात ग्लुकोज कमी शोषण्यास मदत करतात. तसेच, त्यांच्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म, व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
जांभूळ
जांभळाला इंडियन ब्लॅक बेरी किंवा ब्लॅक प्लम असेही म्हटले जाते, त्याचे मधुमेही रुग्ण सेवन शकतात. या फळामध्ये 82 टक्के पाणी असते, व सुक्रोज कमी आढळते. त्यामुळे जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखरेची वाढ होत नाही.
नासपत
व्हिटॅमिन सी, ई आणि के यांनी समृद्ध असलेले नासपत हे फळं मधुमेहाचे रुग्ण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात. कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि बीटा कॅरोटीन हेदेखील त्यामध्ये आढळतात. भरपूर फायबर असल्याने नासपत मधुमेहींसाठी चांगले असते. .
सफरचंद
ॲन ॲपल अ डे, कीप्स द डॉक्टर अवे… असे म्हटले जाते. सफरचंदामध्ये केवळ भरपूर फायबर नसतात, तर त्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही असतात. सफरचंद खाल्याने ग्लूकोजची पातळी स्थिर होण्यास मदत होते. रक्तातील साखर नियंत्रणासाठी आहारात मर्यादित प्रमाणात सफरचंदाचाही समावेश करता येतो.
किवी
किवीमध्ये उच्च फायबर असते व ते रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 49 आहे जो मधुमेहासाठी चांगला आहे. यासोबतच, किवी शरीरातील साखरेचे शोषण कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.