तुम्हीसुद्धा आहात का चहाबाज ? पण पुढचा कप घेण्याआधी दुष्परिणाम तर जाणून घ्या, गर्भवतींसाठी तर खूपच धोकादायक
Tea Side Effect : चहाचे अनेक शौकीन तुम्ही पाहिले असेल. बरेच लोक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक वेळा चहा पितात. पण जास्त चहा प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो, हे माहीत आहे का ? जास्त चहा पिण्यामुळे काय नुकसान होऊ शकते, ते जाणून घेऊया.
नवी दिल्ली : जवळपास सर्वच वयोगटातील लोक चहाचे (tea) शौकीन असतात. अनेकजण आपल्या सकाळची सुरुवात चहाच्या घोटाने (tea in the morning) करतात. चहा हा बर्याच लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. हवामान कोणतेही असो, पण चहा प्यायलाच पाहिजे. त्यामुळे चहा हे जगातील सर्वात लोकप्रिय पेय मानले जाऊ शकते. बरेच लोक दिवसातून एकदा किंवा दोनदा नव्हे तर अनेक वेळा चहा (drinking tea many times) पितात. मात्र, चहाबद्दल असलेल्या या जास्त प्रेमामुळे लोकांना त्रास होऊ शकतो.
चहाच्या अतिसेवनामुळे लोकांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चहाच्या अतिसेवनामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, लोकांनी दिवसात तीन किंवा चार कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नये. जर तुम्ही एका दिवसात 710 मिली पेक्षा जास्त चहा प्यायलात तर आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जास्त चहा पिण्याने आरोग्याचे काय नुकसान होते, ते जाणून घेऊया.
मानसिक आरोग्यावर होतो वाईट परिणाम
चहामध्ये कॅफिनचे प्रमाण भरपूर असते. कॅफेनच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी, तणाव आणि चिंता वाढू शकते. जास्त चहा प्यायल्याने अस्वस्थताही येते या सर्वाचा आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो असे म्हणता येईल. त्यामुळे जास्त चहा पिणे टाळावे.
गर्भवती महिलांसाठी चहाचे अतिसेवन ठरते हानिकारक
चहाचे अतिसेवन गर्भवती महिलांसाठीही हानिकारक ठरू शकते. कॅफेनच्या अतिसेवनाने गर्भधारणेमध्ये गुंतागुंत होऊ शकते. कधीकधी यामुळे गर्भपात देखील होऊ शकतो. चहातील कॅफेनचा विपरीत परिणाम गर्भात वाढणाऱ्या बाळावर व त्याच्या विकासावरही होतो. म्हणूनच गर्भवती महिलांनी जास्त चहा पिणे टाळावे, असा सल्ला डॉक्टर देतात.
झोप न येणे किंवा निद्रानाश
चहाच्या अतिसेवनामुळे निद्रानाशही होऊ शकतो. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक तणाव, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे आणि चिंता यांसारख्या अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. चहामध्ये असलेले कॅफेन तुमच्या झोपेच्या चक्रावर परिणाम करते. झोपण्याच्या 6 तास आधी कॅफिनचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते.
आतड्यांसाठी नुकसानकारक
चहाचे अतिसेवन हे आतड्यांसाठीही हानिकारक आहे. याच्या अतिसेवनामुळे आतड्यांचे नुकसान होण्याचा धोका असतो त्यामुळे अन्न पचण्यात समस्या निर्माण होऊ शकते. पचन बिघडले तर मूळव्याध, बद्धकोष्ठता तसेच पोटाचे इतर विकार होऊ शकतात. तसेच आरोग्याशी संबंधित इतर समस्याही उद्भवू शकतात.
गॅसेसचा त्रास
अनेकांना सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय असते. त्यामुळे चयापचय प्रक्रिया मंदावते. यामुळे गॅस आणि पोटात जळजळ होऊ शकते. यासोबतच शरीरात अशक्तपणाही येऊ शकतो. म्हणूनच रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.