त्वचा ‘पातळ’ झाल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या; का होते आपली त्वचा पातळ ? जाणून घ्या, कारणे आणि त्यावरील उपाय!

कॅटरीना कैफ ला पाहिले की, प्रत्येक युवतीला तिच्यासारखीच आपलीही स्कीन व्हावी असे वाटते. पण त्यासाठी ती काय करत असेल, नक्कीच महागडे उत्पादने वापरत असेल असा समज प्रत्येकीचा होतो. परंतु, तसे नसून, कॅटरीना तिच्या सुंदर त्वचेसाठी अगदी सोप्या ब्युटी टिप्स फॉलो करते.

त्वचा ‘पातळ’ झाल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या; का होते आपली त्वचा पातळ ? जाणून घ्या, कारणे आणि त्यावरील उपाय!
त्वचा Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 10:29 PM

काही लोकांची त्वचा इतकी पातळ (The skin is so thin) असते की त्यांना अनेकदा आरोग्य आणि त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्वचा पातळ होण्यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता किंवा त्याची काळजी न घेणे यासारख्या कारणांचा समावेश आहे. बर्‍याच लोकांना असे वाटते की पातळ त्वचेची समस्या वृद्धांसाठी आहे, परंतु तसे नाही. ही समस्या कोणालाही होवु शकते. स्क्रॅचिंग व्यतिरिक्त, त्वचा पातळ असल्यास, खोल दुखापत किंवा खाज सुटण्याची समस्या (Problems with itching) असू शकते. इतकंच नाही तर त्यामुळे उन्हाचा त्रासही होऊ शकतो. त्वचा पातळ झाल्यावर शरीरावरील शिरा आणि हाडे स्पष्ट (Clear veins and bones) दिसु लागतात. सामान्यपणे याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही. अशा प्रकारे त्वचा पातळ होण्याचे नेमके काय कारण आहे आणि ती जाड होण्‍यासाठी कोणते उपाय करता येऊ शकतात याबाबत तुम्हाला माहिती असायला हवे.

या कारणामुळे होते त्वचा पातळ

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपली त्वचा तीन थरांनी बनलेली असते. त्यातील सर्वात आतील भाग हायपोडर्मिस आहे, जो चरबी आणि घाम ग्रंथींनी बनलेला आहे. याच्या वर त्वचेचा थर असतो आणि सर्वात बाहेरील थर म्हणजे एपिडर्मिस. एपिडर्मिसमध्ये चरबीच्या कमतरतेमुळे, त्वचा पातळ होऊ लागते. तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल, तर अशा स्थितीत ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाढते वय हेही याला कारण आहे. तसेच, जर त्वचा सतत तीव्र सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असेल, तर तुम्हाला ही समस्या होऊ शकते.

हा उपाय करा

1.) जास्तीत जास्त पाणी प्यावे (हायड्रेटेड राहा): आरोग्याची किंवा त्वचेची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी शरीरात पूर्ण प्रमाणात पाणी असले पाहिजे. असे म्हणतात की पाणी आपल्या जीवनात रामबाण औषधाची भूमिका बजावते. दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.

हे सुद्धा वाचा

2. धुम्रपान सोडा: वैद्यकीय तज्ञांच्या अभ्यासानुसार धूम्रपानामुळे केवळ आरोग्यच नाही तर त्वचेचेही नुकसान होते. तुम्ही धूम्रपान करत असाल तर आतापासून ही सवय बदलायला सुरुवात करा.

3. तीव्र सूर्यप्रकाश टाळा:- त्वचेला डी-जिवनसत्व उन्हातून मिळते, पण ते फक्त कोवळ्या उन्हातूनच त्वचा ग्रहण करते. उन्हाची तीव्रता जसजशी वाढू लागते त्यातून अल्ट्रावायलेट (अतिनील किरणे) उत्सर्जीत होत असल्याने ते त्वचेसाठी खुप घातक असतात. म्हणून जर तुम्हाला उन्हात जायचे असेल तर त्वचेला व्यवस्थित झाकूनच बाहेर जा. याशिवाय अर्धा तास आधी सनस्क्रीन लावल्यानंतरच बाहेर जा.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.