Dehydration : शरीरातील ही लक्षणे आहेत डिहायड्रेशनचे संकेत, काय कराल उपाय ?

Dehydration In Summers: उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे लघवी पिवळी होते. हे सगळ्यात सुरूवातीचे लक्षण आहे.

Dehydration : शरीरातील ही लक्षणे आहेत डिहायड्रेशनचे संकेत, काय कराल उपाय ?
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 4:53 PM

नवी दिल्ली : उत्तर भारतासह देशातील अनेक भागात हवामान उष्ण (Summer) होत आहे. या हवामानात अनेक प्रकारच्या आजारांचा धोका असतो. यापैकी डिहायड्रेशन (शरीरात पाण्याची कमतरता) ही समस्या या ऋतूमध्ये सामान्य आहे. डिहायड्रेशन (Dehydration) ही एक छोटीशी समस्या आहे, पण ती खूप गंभीर परिणाम करू शकते. काही वेळेस परिस्थिती इतकी बिकट होते की त्यामुळे हृदयविकाराचा झटकाही (heart problem) येऊ शकतो. बहुतेक लोकांना डिहायड्रेशनची लक्षणे माहित नाहीत. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास काय त्रास होतो ते आपण जाणून घेऊया.

वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली असेल तर मनुष्याच्या लघवीचा रंग गडद पिवळा होऊ लागतो. हे सर्वात पहिलेआहे. जर लघवी पिवळसर होत असेल आणि कमी येत असेल तर हे स्पष्टपणे सूचित करते की तुम्ही डिहायड्रेशनचे बळी आहात. काही लोकांना लघवी नीट होत नाही आणि त्यांना जळजळ देखील होऊ शकते. पाण्याअभावीही अचानक चक्करही येऊ शकते. शरीरातील अशक्तपणामुळे असा त्रास होऊ शकतो.

हृदयरोगाचाही असतो धोका

डिहायड्रेशनमुळे फ्रिबिलेशन होण्याचा धोका (हृदयाचा वेग अचानक वाढणे) असल्याचे डॉक्टर सांगतात. यामुळे, हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. जरी अशी प्रकरणे फार दुर्मिळ असली तरी ते अत्यंत धोक्याचे आहे. अशा परिस्थितीत शरीरात पाण्याची कमतरता भासू नये याची काळजी घेतली पाहिजे. विशेषत: लहान मुले आणि जे लोक कामाच्या संदर्भात बराच वेळ बाहेर किंवा उन्हात जातात, त्यांनी पुरेशी, नीट काळजी घ्यावी. कारण दीर्घकाळासाठी सूर्यप्रकाशात राहिल्याने शरीराचे निर्जलीकरण होऊ शकते.

हीट स्ट्रोकचाही होऊ शकतो त्रास

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, उष्माघाताचे प्रमाण पुढील काही महिने वाढू शकते. उन्हाळ्यात होणारा हा धोकादायक आजार आहे. उष्माघातामुळे मृत्यूही होऊ शकतो. याला हीट स्ट्रोक असेही म्हणतात. उष्माघातामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. यासोबतच उलट्या किंवा मळमळ असाही त्रास होतो. हे रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे जास्त काळ थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न येणे.

डिहायड्रेशनच्या त्रासापासून असा करावा बचाव

– प्रत्येक व्यक्तीने दर रोज किमान 7 ग्लास पाणी प्यायले पाहिजे.

– नुसते पाणी पिणे शक्य नसेल तर त्यात चिया सीड्स, अथवा काकडी, पुदीना घालून पाण्याचा स्वाद वाढवा.

– ऋतूमानानुसार मिळणारी फळे आणि भाज्या, सलाड भरपूर प्रमाणात खावे.

– जास्त वेळ उन्हात बाहेर राहू नका

– तुम्ही दही, ताक, नारळ पाणी आणि लस्सी यांचे देखील सेवन करू शकता.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.