मुलांच्या पोटात जंत झालेत की नाही कसे ओळखावे ? जाणून घ्या लक्षणे

पोटातील जंत ही एक सामान्य समस्या आहे. ते (जंत) केवळ लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्यांच्या शरीरात देखील आढळतात. हे कृमी परजीवी असतात, जे आपल्या शरीरात पोहोचतात आणि शरीराचे आतून नुकसान करतात.

मुलांच्या पोटात जंत झालेत की नाही कसे ओळखावे ? जाणून घ्या लक्षणे
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 8:28 AM

नवी दिल्ली : लहान मुले अनेकदा पोटदुखीची (stomach pain) तक्रार करतात. कधीकधी वेदना आणि अस्वस्थतेची ही समस्या किरकोळ असते आणि काही दिवसात हा त्रास बराही होतो. पण काही वेळेस मुलं अनेक दिवस पोटदुखीची तक्रार करत असतात. हळूहळू मुलं चिडचिडी होऊ लागतात तसेच खाणं-पिणं पूर्णपणे बंद करतात. डॉक्टरांच्या मते, ही एक गंभीर स्थिती आहे आणि पालकांनी ते हलक्यात घेऊ नये, तसेच त्याकडे दुर्लक्षही करू नये. खरंतर, अशा समस्या हे आतड्यांतील कृमी किंवा जंतांचे (worms in stomach) लक्षण असू शकते, ज्यामुळे मुलांमध्ये कुपोषण आणि अशक्तपणाचा (weakness) धोका वाढू शकतो.

पोटात जंत का होतात ? त्याची लक्षणे काय कोणती?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पोटातील जंत ही एक सामान्य समस्या आहे. ते (जंत) केवळ लहान मुलांमध्येच नाही तर मोठ्यांच्या शरीरात देखील आढळतात. हे कृमी परजीवी असतात, जे आपल्या शरीरात पोहोचतात आणि शरीराचे आतून नुकसान करतात. दूषित अन्न खाल्‍याने किंवा अन्नपदार्थांसोबतच पोटात धूळ आणि घाण जाणे, तसेच खराब जीवनशैली आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे पोटात जंतांचा त्रास होतो.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, शरीरात विविध प्रकारचे जंत असतात, ज्यामध्ये कृमी, गांडुळे, पिनवर्म्स आणि हुकवर्म्स प्रमुख आहेत. हे जंत आपल्या शरीरात वाढतात आणि इतर अनेक प्रकारच्या इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरतात. ते आतड्याच्या आतील भिंतींना चिकटतात आणि त्यांची संख्या वेगाने वाढवतात, ज्यामुळे अनेक रोग होतात. त्यांच्यावर योग्य वेळी उपचार न झाल्यास आरोग्याच्या समस्या आणखी गंभीर होतात. म्हणूनच, त्यांची वेळेवर ओळख पटणे आणि योग्य उपचार आवश्यक असतात.

पोटात जंत झाल्याची लक्षणे –

– भूक न लागणे

– अचानक वजन कमी होणे

– रॅशेस

– पोटात वेदना होणे

– बद्धकोष्ठता

– डायरिया

– वारंवार लघवी होणे

– अत्याधिक थकवा

पोटातील जंतांपासून आराम मिळवण्यासाठी टिप्स

ओव्याचा करा असा वापर

जंतांपासून मुक्त होण्यासाठी ओव्याच्या बियांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यासाठी अर्धा ते एक चमचा ओव्याच्या बिया घेऊन त्यात समप्रमाणात गूळ मिसळावा व त्याचे सेवन करा. नंतर थोडं पाणी प्या. तसेच तुम्ही सैंधव मीठासह ओव्याचे सेवन करून त्यावर पाणी पिऊ शकता.

कडुलिंबाची पाने ठरतील उपयोगी

कडुलिंब हे अँटी-बॅक्टेरिअल तत्वांनी युक्त औषध आहे. पोटातील जंतांपासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाची ताजी पाने स्वच्छ धुवून ती बारीक वाटून पेस्ट तयार करावी. त्यामध्ये थोडासा मध मिसळावा व सेवन करावे. यामुळे पोटातील जंतांची समस्या कमी होऊ शकते.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....