Year End 2022: यावर्षी वेट लॉसची ‘ही’ टेक्निक्स झाली हिट, अनेकांनी केले फॉलो

लोक दरवर्षी वजन कमी करण्याचा संकल्प करतात, त्याप्रमाणे यंदा, म्हणजेच 2022 सालीही य्नेक लोकांनी वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे डाएट आणि टेक्निक्स वापरून पाहिले. यावर्षी कोणते ट्रेंड लोकप्रिय झाले ते पाहूया.

Year End 2022: यावर्षी वेट लॉसची 'ही' टेक्निक्स झाली हिट, अनेकांनी केले फॉलो
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 3:01 PM

नवी दिल्ली – नवं वर्ष सुरू झालं की प्रत्येक जण काही न काही संकल्प करतो. त्या संकल्पांमध्ये पहिला क्रमांक लागतो, तो म्हणजे वजन कमी करण्याचा. ज्या लोकांना खरोखर वजन कमी करायचे असते ते त्यासाठी वेट लॉस ट्रेंड (weight loss) फॉलो करण्यास सुरूवात करतात. यंदा म्हणजेच 2022 सालीही अनेक वेट लॉस ट्रेंड्स सोशल मीडियावर गाजत होते. तुम्ही जर स्वत: साठी योग्य डाएट आणि वर्कआऊट (diet and workout plan) प्लान निवडलात तर वजन कमी करण्याचे तुमचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. यंदा कोणते वेट लॉस टेक्निक्स अथवा डाएट्स ट्रेंडमध्ये (trends in 2022) होते हे जाणून घेऊया.

इंटरमिटेंट फास्टिंग

वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग वेट लॉस डाएट टेक्निकला यंदा लोकांची सर्वात जास्त पसंती मिळाली. यामध्ये लोक दिवसभरात एका ठराविक वेळेत जेवतात आणि उर्वरित वेळ उपास करतात. गेल्या काही दशकांपासून उपास करण्याचा कल लक्षणीयरित्या वाढला आहे. इंटरमिटेंट फास्टिंग मध्ये 16/8 तासांनुसार डाएट प्लॅन ठरवला जातो. 8 तासांमध्ये तुम्ही खाऊ शकता व उरलेले 16 तास तुम्हाला उपास करावा लागतो. या तंत्राचे योग्यरित्या पालन केले तर वजन कमी करण्यात यश मिळू शकतं. मात्र हे टेक्निक अवलंबताना हेल्दी इटिंग केले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

हे सुद्धा वाचा

किटो डाइट

वजन कमी करण्यासाठी यावर्षी अनेक लोकांनी किटो डाएटे पालन केले. यामध्ये कार्बचे सेवन कमी होते, तसेच फॅट्सचे प्रमाण सर्वाधिक त्यानंतर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असतो. कमी कार्ब्स आणि हाय फॅट डाएट घेतल्याने वजन वेगाने कमी होते. यामध्ये असलेले प्रोटीन हे भूक नियंत्रित करते, मेटाबॉलिक रेट वाढवतो. किटो डाएटमध्ये अंडी, मांस, चिकन, मासे, सी फूड, ब्रोकोली, फ्लॉवर, टोमॅटो, नट्स, बिया, काजू , बदाम यांचे सेवन करता येते.

प्लांट बेस्ड प्रॉडक्ट्स

यावर्षी वजन कमी करण्यासाठी लोकांनी प्लांट बेस्ड प्रॉड्क्ट्स किंवा डाएट हे खूप फॉलो केले. प्लांट बेस्ड प्रॉडक्ट्सचे सेवन केल्याने शरीराला सर्व प्रकारचे पोषक घटक मिळतात, जे आपले वजन कमी करण्यास मदत करतात. यामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा, डाळी, काजू इत्यादींचा समावेश आहे. हे सर्व पदार्थ वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. प्लांट बेस्ड डाएटचे सेवन प्रामुख्याने शाकाहारी लोक करतात. हे डाएट शरीरासाठी निरोगी मानले जाते. हे डाएट फॉलो केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळीही सामान्य होते.

मेडिटरेनिअन डाएट

मेडिटरेनिअन डाएटचाही यावर्षी अनेक लोकांनी अवलंब केला. या डाएटचे योग्य प्रकारे पालन केल्याने वजन कमी करणे सोपे जाते. या डाएटमध्ये ताजी फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य, मासे, काजू, शेंगा, ऑलिव्ह ऑईल इत्यादींचा समावेश असतो. तसेच तुम्ही दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी एका मर्यादित प्रमाणात खाऊ शकता. मात्र या डाएटमध्ये रिफाइंड शुगर, प्रोसेस्ड फूड्स यांचे सेवन बिलकूल केले जात नाही. यात अजिबात समावेश नाही. मेडिटरेनिअन डाएट पालन केल्यास आपल्या हृदयाचे आरोग्य आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य प्रमाणात राहते.

होम वर्कआउट

वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट जेवढे महत्वाचे आहे, तेवढाच महत्वाचा व्यायामही असतो. गेल्या काही वर्षात कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू झाले. त्यामुळेच अनेक लोकांनी घरच्या घरी वर्कआऊट करणेही पसंत केले. यंदा होम वर्कआउट खूप फॉलो केले गेले. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक लोकांनी डान्सिंग, झुम्बा, कार्डिओ, योगासने, वेट लिफ्टिंग असा व्यायाम करत वर्कआऊट करण्यावर भर दिला. जिममध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरी व्यायाम करून वजन कमी करण्याची कल्पना ही बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.