‘हे’ पदार्थ एकत्र खाल तर पस्तावाल ! जाणून घ्या खराब फूड कॉम्बिनेशन
वजन कमी करताना, तुम्ही काही पदार्थ एकत्र खाण्याची चूक करू नका, जे तुमचे वेट लॉस रुटीन बिघडवू शकतील.
नवी दिल्ली : वजन वाढवणे जितके सोपे आहे तितकेच कठीण आहे वाढलेले वजन कमी करणे. वजन कमी (weight loss) करण्यासाठी केवळ कठोर परिश्रम करून चालत नाही तर आहारकडेही पुरेसे लक्ष द्यावे लागते. वजन वाढल्यामुळे (weight gain) तुमच्या कंबरेवर तसेच शरीराच्या काही महत्त्वाच्या भागांवर दबाव येऊ लागतो, त्यामुळे समस्या सुरू होतात. म्हणूनच वाढत्या वजनावर लक्ष ठेवणे आणि असे उपाय करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमच्या वेट लॉस रुटीनमध्ये (weight loss routine) कोणताही अडथळा येणार नाही. वजन कमी करताना, तुम्ही काही पदार्थ एकत्र खाण्याची चूक करू नका, जे तुमचे वेट लॉस रुटीन बिघडवू शकतील. अशा अनारोग्यदायी फूड कॉम्बिनेशनबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे वेट लॉस रुटीन बिघडू शकते.
1) चहा आणि भजी
जे लोक सकाळी उठल्यानंतर चहाने दिवसाची सुरुवात करतात आणि विशेषत: जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी एक वाईट बातमी आहे. तुम्ही कधीही चहासोबत भजीचे सेवन करू नये, कारण त्याचा तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. एवढेच नाही तर चहामध्ये असलेले टॅनिन आणि कॅफिन लोहाच्या शोषणावर परिणाम करतात, ज्यामुळे गॅस आणि पोट फुगणे असा त्रास होऊ शकतो.
2) दूध आणि केळं
दूध आणि केळ यांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात, पण ते एकत्र खाणं हानिकारक ठरू शकतं. पण बहुतेक लोक ही चूक करतात आणि दुधासोबत केळं खाणं पसंत करतात. जरी या दोन्ही पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असले तरी त्यांचे एकत्र सेवन केल्यास वजन वाढू शकते. तुम्हाला हवे असल्यास तर हे दोन्ही पदार्थ तुम्ही 20 ते 30 मिनिटांच्या अंतराने खाऊ शकता, पण ते एकत्र खाण्याची चूक कधीच करू नका.
3) जेवणानंतर गोड खाणं
अनेकदा लोकांना जेवण केल्यानंतर काहीतरी गोडं खायला आवडते, पण त्यामुळे तुमची तब्येत बिघडते. तसेच तुमचे वेट लॉस रुटीनही बिघडते. जर तुम्ही आधीच पोटभर जेवण केले असेल तर जेवल्यानंतर मिठाई खाण्याची चूक करू नका. त्याऐवजी थोडा वेळ वाट बघूवन नंतर तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता.
4) पोळी व भात
जेव्हा तुम्ही पोळी आणि भात एकत्र खाता तेव्हा तुमचं पोट भरत असलं तरी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त होतो. एवढेच नाही तर दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्याने स्टार्चचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे अपचन, पोट फुगणे अशा समस्या निर्माण होतात. तसेच तुमची चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिज्मही मंदावते.
5) अती प्रोटीन खाणे
वजन कमी करण्यासाठी प्रथिनांचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे, परंतु जास्त प्रथिने तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतात. एकाच वेळी जास्त प्रथिने खाणे तुमच्या पोटासाठी चांगले नाही कारण ते पचणे खूप कठीण असते. त्यामुळे एकाच वेळी जास्त प्रोटीनचे सेवन करू नये, हे लक्षात ठेवा.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)