नवी दिल्ली : डोळे हा आपल्या शरीराचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्याच्या मदतीने आपण आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यापर्यंत, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो. शरीराच्या या मौल्यवान भागाचा आपण खूप वापर करत असतो, पण त्याची नीट काळजी घेण्याबाबत (eye care) मात्र आपण अनभिज्ञ असतो. मोबाईल आणि टीव्हीच्या स्क्रीनकडे (mobile and TV screen) तासन्तास पाहिल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. स्क्रीनच्या प्रकाशाचा आपल्या दृष्टीवर परिणाम (effect on eyes) होतो हे तुम्हाला माहीत आहे. आपल्या डोळ्यांचा शत्रू असलेल्या टीव्ही आणि स्क्रीनवर आपण तासनतास घालवतो.
आपल्या काही चुकीच्या, वाईट सवयींमुळे आपली दृष्टी कमी होते. सध्या लोकं स्मार्टफोनचा खूप जास्त वापर करतातच, डोळ्यांसाठी पुरेसे पोषक व सकस अन्न खात नाहीत. तासनतास कामात व्यस्त असतात, पुरेसं पाणी पीत नाहीत आणि धूम्रपानही करतात. आपल्या या घाणेरड्या सवयींचा परिणाम आपल्या डोळ्यांवर स्पष्टपणे दिसून येतो.
डॉक्टरांच्या मते डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपली दृष्टी वाढवण्यासाठी आहारात ‘अ’ जीवनसत्त्वाचे सेवन करणे आवश्यक आहे. कोणत्या टिप्सचा अवलंब करून डोळ्यांची दृष्टी वाढू शकते, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
भाज्यांमुळे मिळेल व्हिटॅमिन ए
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दृष्टी वाढवण्यासाठी आहारात लाल भाज्यांचे सेवन केले पाहिजे. लाल भाज्यांमध्ये गाजर, सिमला मिरची, पपई तसेच दूध यांचे सेवन करावे. तुम्ही व्हिटॅमिन ए साठी त्याच्या सप्लिमेंट देखील घेऊ शकता, मात्र त्यासाठी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्हिटॅमिन ए ची कमतरता पूर्ण करून तुम्ही तुमची दृष्टी वाढवू शकता.
पेनाच्या सहाय्याने करा डोळ्यांचा व्यायाम
शरीरासोबत डोळ्यांचा व्यायामही महत्वाचा ठरतो. त्यासाठी तुम्ही पेनाचा वापर करू शकता. एक पेन घ्या व त्याची टीप पहा. हळू हळू पेन नाकाजवळ आणा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. टीप पाहून पेन पुन्हा लांब न्यावे. हा व्यायाम दिवसातून दहा वेळा करा. या पद्धतीचा अवलंब केल्यास डोळ्यांचे स्नायू बळकट होऊन दृष्टी वाढते.
डोळ्यांचा गोलाकार व्यायाम
जर तुम्हाला दृष्टी वाढवायची असेल तसेच डोळ्यांचे स्नायू बळकट करायचे असतील तर डोळे गोलाकार गतीने फिरवा. गोल गोल डोळे फिरवत तुम्ही भिंतीकडे पहात राहा, तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहील.
थोड्या-थोड्या वेळाने डोळे मिचकावत रहा
तुमचे डोळे अधिक कमकुवत होऊ नयेत आणि तुमच्या चष्म्याचा नंबर जास्त वाढू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या डोळ्यांना मध्ये-मध्ये ब्रेक द्या. जर तुम्ही डेस्कवर काम करत असाल तर काही वेळाने डोळ्यांना ब्रेक द्या आणि ते मिचकावत रहावे. मधेच पापण्या मिचकावल्याने डोळ्यांवरील ताण दूर होतो. 2 सेकंद डोळे बंद करा, नंतर ते उघडा आणि 5 सेकंद सतत ब्लिंक करत रहा. दिवसातून 5-6 वेळा या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्ही तुमच्या डोळ्यांचे सहज संरक्षण करू शकता.