Health : तुमचं वय कितीही असूदेत हे व्यायाम केलेच पाहिजेत, काम रहाल फिट!
व्यायाम केल्यामुळे आपलं अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. पण फिट राहण्यासाठी दररोज नेमके कोणत्या व्यायाम करायचे असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो. तर आता आपण काही अशा व्यायामांबाबत जाणून घेणार आहोत जे आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जगात फिट राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक जण फिट राहण्यासाठी नेहमी काही ना काही उपाय करताना दिसतं. मग वय कोणताही असो वृद्ध लोक असो तरुण मुलं असो फिट राहण्यासाठी ते नेहमी काही ना काही प्रयत्न करत असतात. मग आहार असो किंवा व्यायाम किंवा जिमला जाणं असो असे अनेक वेगवेगळे उपाय लोक करत असतात. त्यात फिट राहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात व्यायाम करताना दिसतात. व्यायाम केल्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात, आपली प्रतिकार शक्ती सुधारते आणि आपले हृदय देखील निरोगी राहते तसेच आपले मानसिक आरोग्य देखील चांगले राहते.
Hindu Squats हा व्यायाम आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही तुमची हाडे मजबूत ठेवण्यासाठी तसेच तुमचे स्नायू निरोगी राहण्यासाठी Hindu Squat करू शकता. हा व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर लवचिक होते तसेच तुमच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
प्रत्येकाने दररोज श्वासोच्छवासाचा व्यायाम करणे गरजेचे आहे. हा व्यायाम केल्यामुळे आपल्या फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरते. तसेच हा व्यायाम केल्यामुळे तुमचे फुफुसाचे कार्य सुधारते आणि ते मजबूत राहण्यास मदत होते. श्वासोच्छवासावामुळे आपल्या रक्ताभिसरणाला गती मिळते तसेच आपले मानसिक आरोग्य देखील निरोगी राहते.
प्रत्येकाने दररोज सकाळी जॉगिंग करणे गरजेचे आहे. ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे तसेच ज्यांना फिट राहायचंय अशांनी जॉगिंग करणं गरजेचं आहे. जॉगिंग केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील मजबूत होते. तुमच्या शरीराची लवचिकता देखील टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे तुमचे वय कितीही असलं तरी जॉगिंग केल्यामुळे तुमचा फिटनेस कायम राहतो.
स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमचे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. तसेच तुमचे हाडे मजबूत होतात, स्नायू वरील ताण कमी होण्यास मदत होते. तसेच स्ट्रेचिंगमुळे शरीरातील वेदना देखील कमी होण्यास मदत होते. स्ट्रेचिंगमुळे आपल्या शरीरातील स्टॅमिना वाढण्यास मदत होते त्यामुळे स्ट्रेचिंग करणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते.
प्रत्येकाने दररोज वेगाने चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. हा व्यायाम केल्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. नियमितपणे चालल्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे अशांनी देखील वेगाने चालण्याचा व्यायाम केला पाहिजे. तसेच या व्यायामुळे तुमचे हृदय निरोगी राहते त्यामुळे हा व्यायाम करणे फायदेशीर ठरते.