चुकीच्या लाइफस्टाइलमुळे खराब होऊ शकते लिव्हर, आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

अनेक पौष्टिक पदार्थांच्या सहाय्याने यकृताचे आरोग्य सुधारता येऊ शकते.

चुकीच्या लाइफस्टाइलमुळे खराब होऊ शकते लिव्हर, आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 3:59 PM

नवी दिल्ली – जास्त प्रमाणात मद्यपान (alcohol) केल्यास आपल्या लिव्हरवर (liver) म्हणजेच यकृतावर सर्वाधिक परिणाम होतो. मद्याचे अतिसेवन केल्यास लिव्हर डॅमेज होऊ शकते. जे लोक सतत दारू पितात, त्यांचे लिव्हर लवकर कमकुवत होऊ लागते. म्हणूनच ही वाईट सवय लवकरात लवकर सोडवून लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी निरोगी व पौष्टिक आहार (foot to eat) घेणे महत्त्वाचे आहे. याशिवाय हेपेटायटीस बी आणि सी हेही लिव्हरसाठी अत्यंत घातक असते. एवढेच नव्हे तर कोविडमुळेही लिव्हर खराब झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत.

लिव्हरच्या मदतीने सर्व प्रकारचे फॅट्स, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट मॅनेज करणे सोपे होते. अनेक पौष्टिक पदार्थांच्या सहाय्याने यकृताचे आरोग्य सुधारता येऊ शकते. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

ओटमीलचा करा आहारात समावेश

हे सुद्धा वाचा

ओटमीलमध्ये फायबर आढळते, हे पोषक तत्व आपल्या पचनासाठी खूप उपयुक्त ठरते. त्यासोबतच ते यकृत निरोगी ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्ही नाश्त्यासाठी ओटमील खाऊ शकता. दुधासोबतही त्याचे सेवन करू शकता.

ग्रीन टी फायदेशीर

लिव्हरचा कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून दोनदा ग्रीन टी प्यावा. मात्र, ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन करू नका, अन्यथा त्याचा फायदा न होता त्यामुळे आरोग्याचे नुकसान होईल.

हिरव्या पालेभाज्या

पालकासह हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. जर नियमितपणे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या तर ते संपूर्ण शरीरासाठी व लिव्हरसाठीही फायदेशीर ठरते. त्यामुळे आहारात पालक, केल व कोबी यांचा समावेश करा.

द्राक्षांचे करा सेवन

नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्यास लिव्हर निरोगी होण्यास मदत होते.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.