हे पाच आजार असलेल्या लोकांनी चुकूनही खावू नये पेरू, होऊ शकतात गंभीर परिणाम
पेरू मध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मात्र काही लोकांनी पेरूचे सेवन करणे टाळले पाहिजे यामुळे त्यांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
रोजच्या आहारात फळांचा समावेश करणे गरजेचे आहे. फळांमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात.निरोगी राहण्यासाठी फळे खाणे अत्यंत आवश्यक आहे. फळांमुळे शरीराला ऊर्जा मिळते.
फळे खात असतांना पेरूचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. पेरू खाल्ल्यामुळे वजन लवकर कमी होते. पेरू हा कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत तर आहेच पण त्यामध्ये फायबरचे प्रमाण असते त्यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
त्यासोबतच पेरू मध्ये असलेले पोषक तत्व तुम्हाला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतात पण काही लोकांनी पेरूचे सेवन करणे टाळले पाहिजे. जर तुम्ही पेरूचे जास्त प्रमाणात सेवन केले तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.
लो बीपी
जर तुम्ही आधीच रक्तातील साखर कमी करण्याचे औषधे घेत असाल किंवा तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही पेरूचे सेवन अजिबात करू नका जर तुम्ही पेरूचे सेवन केले तर तुमच्या समस्या वाढू शकतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.
एलर्जी होऊ शकते
पेरू खाल्ल्यानंतर काही लोक ऍलर्जीची तक्रार करतात अशा लोकांना पेरू खाल्ल्यानंतर खाज येणे, पुळ्या येणे, सूज येणे अशा तक्रारी असू शकतात. जर तुम्हाला पेरू खाण्याची एलर्जी असेल तर पेरूचे सेवन करणे टाळा.
पचनासंबंधी समस्या
पेरूचे सेवन केल्याने पचन समस्या उद्भवू शकतात. खरंतर पेरूमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे पोट फुगणे, गॅस होणे, पोट खराब होणे, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
गर्भधारणा आणि स्तनपान
गर्भधारणे दरम्यान किंवा स्तनपान करताना महिलांनी पेरूचे सेवन टाळावे. जर तुम्ही पेरूचे जास्त सेवन केले तर तुमच्या समस्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते.
त्वचेची जळजळ
पेरू किंवा पेरूचा अर्क खाल्ल्याने काही लोक त्वचेवर जळजळ झाल्याची तक्रार करू करतात. मुख्यतः एक्झिमाने ग्रस्त असलेल्या लोकांनी अशा प्रकारच्या समस्या झाल्याचे सांगितले आहे.
शस्त्रक्रियेनंतर
तुमची नुकतीच कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर अशा परिस्थितीत पेरूचे सेवन मर्यादित करा. विशेषतः जर तुम्ही कोणतेही औषध किंवा पूरक आहार घेत असाल तर पेरूचे सेवन करणे टाळा.