Health Tips : तापमान वाढतंय, करा या पदार्थांचे सेवन, उद्भवणार नाहीत पोटाच्या समस्या

उन्हाळा सुरू होताच गरमी वाढते आणि शारीरिक समस्यांमध्येही वाढ होताना दिसते. घरात उपलब्ध असलेले काही पदार्थ खाऊन पोटाचे आरोग्या शांत ठेवता येते.

Health Tips : तापमान वाढतंय, करा या पदार्थांचे सेवन, उद्भवणार नाहीत पोटाच्या समस्या
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 3:14 PM

नवी दिल्ली : उन्हाळा आला की अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या वाढू लागतात. उन्हाळ्यात तापमान (heat) वाढले की शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे डिहायड्रेशन (dehydration), उलट्या, जुलाब, चक्कर येणे, अशक्तपणा येणे आदी आजार होऊ लागतात. तसेच उन्हाळ्यात मसालेदार किंवा तळलेले अन्न खाल्ल्याने शरीराची पचनक्रियाही बिघडू लागते. रोगप्रतिकारक शक्ती (immunity) कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा विषाणूंचा धोका वाढतो. या कारणांमुळे देखील लोकांना पोटदुखी, गॅस, पोटात इन्फेक्शन, ॲसिडिटी, लूज मोशन अशा पचनाशी संबंधित समस्या तसेच उन्हाळ्यात उलट्या होणे, असा त्रास होण्यास सुरुवात होते.

उन्हाळ्यात ॲसिडीटी आणि गॅसची समस्या बहुतेकांना होतेच. अशा परिस्थितीत, उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायले पाहिजे अशी शिफारस आरोग्य तज्ञ करतात. त्यामुळे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकू शकेल. तसेच डिहायड्रेशनची समस्याही उद्भवणार नाही.

मात्र, पाण्याव्यतिरिक्त उन्हाळ्यात काही गोष्टींचे सेवन फायदेशीर ठरते. असे काही पदार्थ आहेत, ज्यांच्या सेवनाने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते, तसेच शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्यात पोटाच्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करणे फायदेशीर ठरते ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

उन्हाळ्यासाठी फायदेशीर पदार्थ

काकडी-पपई

प्रत्येक ऋतूमध्ये ताज्या फळांचे सेवन शरीरासाठी फायदेशीर असते. मात्र, उन्हाळ्यात तापमान वाढते तेव्हा काकडी आणि पपई खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची कमतरता पूर्ण होते. पपई आणि काकडीत भरपूर फायबर आढळते. याच्या सेवनाने पोटाला थंडावा मिळतो. पित्ताचे संतुलन राखून ते शरीराचा पीएचही निरोगी ठेवते. उन्हाळ्यात गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या असली तरी काकडी आणि पपईचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

नारळ पाणी

नारळ पाणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्वं असतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. उन्हाचा पारा चढला की नारळपाणी प्यायल्याने शरीराला अंतर्गत गारवाही मिळतो. नारळाच्या पाण्यात बॉडी डिटॉक्स करण्याचे गुणधर्म देखील आहेत. यात फायबरचा दर्जाही असतो, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते.

खरबूज

खरबूज हे उन्हाळ्यातील हंगामी फळ आहे. खरबुजाचे सेवन पोटासाठी फायदेशीर आहे. खरबुजामध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायबर ॲसिड रिफ्लेक्स गुणधर्म आहेत. त्याच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारचे आवश्यक घटक मिळतात. त्याचबरोबर उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता देखील खरबूज दूर करते.

केळं

उष्मा वाढल्यावर एक पिकलेले केळं रोज खावे. केळ्याचे सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे. केळ्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबरचे गुणधर्म असतात. फायबर पचनाच्या समस्या दूर करते, तर पोटॅशियम ॲसिडिटी नियंत्रित करते.

दही किंवा गार दूध

उन्हाळ्यात दररोज दही खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते. दह्यामध्ये भरपूर फायबर असते, जे आतड्यांचे आरोग्य आणि पचन सुधारते. ॲसिडिटी आणि अपचनाची समस्याही दह्याच्या सेवनाने दूर होते. दुसरीकडे थंड दूध प्यायल्याने पोटाला थंडावा मिळतो. त्यामुळे जळजळ, अॅसिडिटीचा त्रास होत नाही. थंड दूध पिणे म्हणजे साधे दूध पिणे, फ्रीजमध्ये ठेवलेले दूध नव्हे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.